Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमनसेत जाऊन चूक केली, ‘या’ नेत्याच्या शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाजवळ उठाबशा!

मनसेत जाऊन चूक केली, ‘या’ नेत्याच्या शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाजवळ उठाबशा!

Shishir Shinde Shiv Sena,Shishir Shinde, Shiv Sena,Shishir, Shinde,Shiv,Sena,MNS,Maha Adhiveshanमुंबई : मनसेने पक्षाचा झेंडा बदलून हिंदुत्वाची भूमिका घेतली. तर दुसरीकडे मनसेतून शिवसेनेत परतलेले माजी आमदार शिशिर शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन मनसेत गेल्याबद्दल माफी मागितली. मनसेत जाऊन चूक केली. बाळासाहेब मला माफ करा, असं म्हणत शिंदे यांनी स्मृतीस्थळावर चक्क उठाबशा काढल्या.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दादर शिवाजीपार्क येथील स्मृतीस्थळावर जाऊन शिशिर शिंदे यांनी ही क्षमायाचना केली. शिंदे सकाळी स्मृतीस्थळी आले आणि त्यांनी चक्क कान पकडून स्मृतीस्थळावर शिवसेनाप्रमुखांची माफी मागितली. त्यामुळे स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांना आश्चर्याचा धक्का बसला. आजचा दिवस स्फूर्ती देणारा आहे. त्यामुळे झालेल्या चुकांबद्दल माफी मागत मी स्फूर्तीस्थळाला वंदन केलं. माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल कान पकडून शिवसेनाप्रमुखांची माफी मागितली. तसंच येत्या काळात आणखी काम करण्याची प्रेरणा देण्याची प्रार्थनाही केली, असं शिशिर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

शिशिर शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक…

शिशिर शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून समजले जात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेतून मनसेत जाणाऱ्या नेत्यांपैकी शिशिर शिंदे हे एक होते. २००९ मधील विधानसभा निवडणुकीत शिंदे मनसेच्या तिकीटावर निवडूनही आलो होते. २०१४ च्या निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments