‘पुन्हा येईन… पुन्हा येईन’ म्हणत कोरोनाही आला; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांसह भाजपवर हल्लाबोल

- Advertisement -
maharashtra-budget-session-uddhav-thackeray-slam-devendra-fadnavis-bjp
maharashtra-budget-session-uddhav-thackeray-slam-devendra-fadnavis-bjp

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत देवेंद्र फडणवीसांसह भाजपावर निशाणा साधला. राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर दिलं. यावेळी विरोधकांनी कोरोना परिस्थितीहून सरकारच्या कामावर उपस्थित केलेल्या प्रश्नांना ठाकरे यांनी उत्तर दिलं. यावेळी ‘पुन्हा येईन… पुन्हा येईन’वरुन ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला.

विधानसभेत बोलता मुख्यमंत्री म्हणाले, “आपण फेसबुक लाईव्हचा उल्लेख केला. मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावं? काय करू नये, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला. ज्या लोकांनी मला संपर्क केला. जो मला प्रतिसाद मिळाला, त्यात महाराष्ट्रातील जनता मला मानायला लागले. ही माझ्या आयुष्यातील मोठी कमाई आहे. पण, मी नेमकं काय करत होतो. आज जी परिस्थिती तयार झाली आहे, करोनाची पुन्हा दुसरी लाट येतेय की काय? अशी शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढतेय. लॉकडाउन करायचा की नाही.

मी फेसबुक लाईव्हमधून तेच सांगत होतो. निष्काळजीपणा करू नका. कारण हा व्हायरस आहे. तो म्हणतोय मी पुन्हा येईन… पुन्हा येईन. काळजी घ्या. दुर्दैवानं थोडसं इकडेतिकडे झालं आणि व्हायरस पुन्हा परत आला,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला.

- Advertisement -

“माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेचा फायदा करोना लसीकरणामध्ये होत आहे. सध्या मी जबाबदार योजना राबवली जात आहे. सरकार काम करत आहे. देशातील सर्वात मोठं जंम्बो कोविड हॉस्पिटल सरकारनं राज्यात उभारलं. महाविकासआघाडी सरकारनं करोना काळात नागरिकांना ५ रुपयांना शिवभोजन थाळी दिली. आम्ही रिकाम्या थाळ्या वाजवल्या नाही. राज्यपालांनी सरकारच्या कामाचं कौतुक केलं आहे. विरोधकांनी नुसत्याच थाळ्या वाजवल्या,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावाला.

मुख्यमंत्री यांच्या उत्तरातील मुद्दे

 •       माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, आमच्या सगळ्या कामांना कायद्याचा आधार
 •       राज्यपाल महादेयांचे भाषण आपण सर्वांनी ऐकल
 •       राज्यपालांना धन्यवाद त्यांनी नि:पक्षपातीपणे सरकारची कामगिरी सर्वांसमोर ठेवली
 •       ते मराठीत बोलले त्याचा अभिमान
 •       त्यांनी मांडलेल्या मुद्दांवर अनेकांना आक्षेप.
 •       राज्यपालांनी भाषण मान्य केले पण त्यांच्याच सदस्यांना ते मान्य नाही
 •       राज्यपाल आपण संस्था मानता त्या संस्थेवरच आपण अविश्वास व्यक्त केला
 •       सुधीरभाऊंनी शिवभोजन योजनेवर बोलले
 •       आपल्या राष्ट्रपतीच्या भाषणात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत आठ महिन्यांसाठी ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिल्याचे म्हटले मग ते लगेच श्रीमंत झाले का?
 •       गॅस, इंधन कोणतीही दरवाढ झालेली यांना चालते
 •       आम्ही शिवभोजन थाळी पाच रुपयांमध्ये दिली जी अजून सुरु आहे
 •       भरलेली थाळी आणि रिकामी थाळीतला फरक गरीबांना कळतो.
 •       सीमाप्रश्नी देवेंद्रजीना मनापासून धन्यवाद. राजकीय जोडे बाजूला ठेऊन राज्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागते. सीमाप्रश्नी एकत्र येण्याची तयारी दाखवल्याबद्दल कर्नाटकवासी मराठी बांधवांच्यावतीने धन्यवाद देतो
 •       कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर कशी सक्ती लादते ते मोडून तोडून काढू
 •       मुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा मराठी भाषा गौरव दिन. आपण नेहमी म्हणतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ पण अजूनही केंद्राकडून मातृभाषेला दारात तिष्ठत उभे केले. मराठी भाषा भिकारी आहे का, ही छत्रपतींची भाषा. ती भाषा भिकारी कशी असू शकते.
 •       छत्रपती नसते तर दिल्लीत जे बसले ते तरी असते का
 •       केंद्राचा हा करंटेपणा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, मराठी माती, मराठी माता हे विसरणार नाही
 •       सावरकरांना भारतरत्न द्या यासाठी दोन वेळ पत्र दिले. १८ आणि १९. भारतरत्न कोण देऊ शकतो, आमदारांची कमिटी हा देऊ शकते का, हा अधिकार पंतप्रधान कार्यालयाला. ते देत नाहीत
 •       आपला देश प्रत्येक क्रिकेट मॅच जिंकणार कारण स्टेडियमचे नाव बदलले, वल्लभभाईचे नाव पुसून टाकता, औरंगाबादचे संभाजीनगर आम्ही करूच
 •       याच विधानपरिषदेत संभाजीनगरच्या विमानतळाचे छत्रपतीचे नाव ही केद्राने अडवून ठेवले
 •       आम्हाला हिंदुत्व शिकवता?
 •       मेरे वतन के लोगो कविता ऐकवलीत… मी म्हणेन, ए महाराष्ट्र के लोगो, पोछ लो आँख का पानी, जो झुट बोले उनकी खतम करो बेईमानी…
 •       भाषणामध्ये यमक नाही तर काम करण्याची धमक पण लागते… ती आमच्या आहे देवेंद्रजी
 •       समर्थ रामदासांच्या ओळी
 •       मना सर्वथा सत्य सोडू नको रे , मिथ्य सोडू नको रे.
 •       किमान आता तरी मिथ्य तरी सोडा विरोधकांना आवाहन
 •       माधव भंडाराची गोष्ट आठवते… माधव नाही… नारायण भंडारी… माधव आणि नारायण दोघेही‍ि दिव्य
 •       नारायण भंडारीला मोठे करणार की नाही, ही कथा ज्याने तुम्हाला लिहून दिली त्यानेच पुढची मला लिहून दिली. (नारायण भंडारीची कथा)
 •       आपण फेसबूक लाईव्हचा उल्लेख केला. मी महाराष्ट्रातील जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावे काय करू नये हे सांगितले
 •       त्यामुळे महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या परिवारातील एक मानू लागले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट
 •       रुग्ण संख्या वाढते आहे आज, काय करायचे काही नाही…
 •       दुर्देवाने थोड इकडे तिकडे झाले आणि मी पुन्हा येईन म्हणत व्हायरस परत आला
 •       माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत महसूल, आरोग्याचे कर्मचारी राज्यात घरोघर गेले. यामुळे सहव्याधी असलेले रुग्ण लक्षात आले
 •       सरकार खबरदारी घेत आहे
 •       देशात जगात पहिले जम्बो हॉस्पीटल आपण उभे केले. किती जणांना उपचार दिले ही माहिती ही आपल्याकडे आहे
 •       केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल
 •       ज्यांनी नोटबंदीच्यावेळी त्यांची स्तुती केली ते यात काम करत होते. ते अर्थशास्त्राचे डॉक्टर. या आपत्तीच्या काळात अर्थशास्त्राचे डॉक्टर बरे की वैद्यकीय शास्त्राचा कंपाऊंडर बरा
 •       ही देशाची की राज्याची थट्टा
 •       त्यांनी बिहार आणि इतर राज्याची तुलना करत निष्कर्ष काढला.
 •       बिहारचा फोलपणा इंडियन एक्सप्रेसने समोर आणला
 •       त्यांच्यावर विश्वास ठेऊन आपल्या महाराष्ट्र तुम्ही बंद करणार?
 •       महाराष्ट्रात रुग्णसंख्या आहे आपण ती लपवली नाही
 •       मार्चमध्ये प्रादुर्भाव सुरु झाला, हॉस्पीटल, बेड नव्हते, रुग्ण आल्यानंतर स्वॅब घेतल्यानंतर रिपोर्ट येऊपर्यंत मृत्यू व्हायचा पारदर्शीपणे माहिती दिली. त्यांना बीपी हार्ट प्रॉब्लेम होते… आणि नंतर त्यांना करोना झाल्याचे ही दिसून आले
 •       ८० टक्के टेस्ट आरटीपीसीआर टेस्ट होतात.
 •       खोट बोलणं आमच्या रक्तात नाही. मग ती बंद दाराआड झालेली चर्चा का असेना
 •       हिंदुस्थान टाईम्स ने ही कोरोना काळात
 •       पंतप्रधानांनी अचानक लॉकडाऊन केला. मी त्यांना फोन केला. लोकल थांबवण्यासाठी प्रयत्न करा, मजुरांना जाण्यासाठी ट्रेन द्या पण तेंव्हा त्यांनी काही नाही केले
 •       लॉकडाऊन केले आणि मग लोक लाखो लोक घरी जात असतांना तांडे च्या तांडे पायी गेले
 •       या लोकांना मोफत अन्नधान्य दिले, त्यांच्या राज्यात जाण्याची व्यवस्था केली. आपापल्या राज्यात गेल्यानंतर उत्तरप्रदेश आणि बिहारच्या लोकांनी इथे उगीच आलो, महाराष्ट्राने यापेक्षा आमची काळजी घेतली असे प्रशंसोद्गार काढले
 •       आमच्याकडे कोविडचा हिशोब विचारता, जरुर विचारा
 •       महाराष्ट्रातील जनतेला सोयी सुविधा देण्यासाठी उपायोजना कराव्या लागतात तेंव्हा आपला फंड महाराष्ट्राला न देता, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला न देता दिल्लीला दिला
 •       ज्यांनी तो दिला त्यांना धन्यवाद
 •       फोल फोल करून नका पोल ला वेळ आहे
 •       पीएम केअर फंडचा हिशोब कोण देणार, त्यांना विचारायचे नाही, हा फंड चौकशीच्या फेऱ्यात येत नाही. आणि कुणी धाडस करून विचारलं की काय,
 •       ईडी..
 •       ही आजची देशातील लोकशाही
 •       कोविडसाठी प्रत्येक जिल्ह्‌यात टास्कफोर्स, खाजगी रुग्णालयात ८० टक्के खाटा राखीव ५ लाख ६० हजार लोकांना जन आरोग्य योजनेचा आपण लाभ दिला
 •       कोविडचे संकट आले तर दोन किंवा तीन चाचणी लॅब होत्या आज ही संख्या ५०० च्या आसपास आहे.
 •       एकट्या मुंबईत २० ते २५ हजार चाचण्या होत आहेत ही आपली उपलब्धता
 •       डायलिसीस चे काय करायचे हा मोठा प्रश्न होता. रुग्ण कोविड आहे की नॉनकोविड हे आधी पहायची गरज होती. डायलिसीस साठी १५० च्या आसपास सुविधा उपलब्ध करून दिल्या.
 •       संसर्गाची साखळी तोडण्याठी लॉकडाऊन हा प्रभावी उपाय. पण ती आमची इच्छा नाही. गोरगरिबाची चुल बंद करायची नाही. गॅस वाढत चालल्याने चुल म्हटलो.. आत्मनिर्भर भारतात गरीबाला ही तेवढीच ताकत मिळाली पाहिजे
 •       शेटजी नसतील तर अर्थचक्र चालणार नाही.
 •       आरोग्य सुविधा वाढवत आहोत, जर्मनी, इटलीसारख्या अनेक देशांनी पुन्हा लॉकडाऊन केले.  आपण सावधपणे पुढे जात आहोत, गरीबांची चुल विझवायची नाही म्हणून “मी जबाबदार”… मी कुटुंब तर माझे कुटूंब सुरक्षित”
 •       मला व्हिलन ठरवले तरी चालेल,वाईट म्हटले चालले तरी मला पर्वा नाही. मी माझ्या राज्याशी बांधील
 •       त्यांची काळजी घेणे माझे कर्तव्य. काही चुकीचे होत असेल तर नक्की कारवाई करू
 •       संकटाशी खेळ करू नका. आमदार खासदार मृत्यूमुखी पडले… हा व्हायरस कुणाला ओळखत नाही.
 •       थट्टा कुणाची करता, माझे कुटुंब माझी जबाबदारीची थट्टा करताय, करा, पण सामान्यांच्या जीवाशी खेळू नका
 •       गर्दी झाली असेल तर दुर्देवी. पण यापुढेही लाट आपण वाढू देऊ नये
 •       दिल्लीच्या टीमला आम्ही कुठे कमी पडतो का सांगा, ते म्हणाले यंत्रणा थकलेली. लॉकडाऊन होते तेंव्हा घराघरात जाऊन चौकशी करणे सोपे पण आता कुटुंब च्या कुटुंब घराबाहेर पडत असतांना त्यांची चौकशी करणे कठीण.
 •       लॉकडाऊन टाळायचे असेल तर त्रिसुत्रीचे पालन करणे आवश्यक, व्हॅक्सीन घेतले तरी.
 •       मास्क वापरा,हात धुवा आणि शारीरिक अंतर ठेवा ही त्रिसुत्री
 •       लस नोंदणी ॲपमध्ये त्रुटी… पण म्हणून मी टीका करणार नाही. कारण काम केली तर चुक होते
 •       लसीकरणाची केंद्रे मोजकी न ठेवता खासगी रुग्णालये ज्यांची क्षमता आहे त्यांना परवानगी देण्याची मागणी आपण केंद्राकडे केली. काल २९ रुग्णालयांना मान्यता मिळाली
 •       संत नामदेव यांचे स्मरण झालेच पाहिजे. आपण एकत्र बसून राज्याची अनमोल रत्ने निश्चित करू. मग महिला असो किंवा पुरुष. त्यांचे नाव काढू. ते मोठे होते म्हणून आपण होतो.
 •       संत नामदेव मराठी मातीच्या पुत्राने पंजाबात जाऊन काम केले, शेतकऱ्यांसाठी काम केले. आज पंजाबचा शेतकरी रस्त्यावर
 •       जे शेतकरी तिकडे आंदोलनासाठी बसले त्यांची वीज कापली जाते, त्यांची शौचालये तोडली जात आहेत, पाणी तोडले जात आहे, एवढेच नाही तर सार्वभौम देशाच्या राजधानीत ते येऊ नये म्हणून मार्गावर खिळे ठोकले जात आहेत
 •       शेतकऱ्यांच्या मर्गात खिळे आणि चीन दिसला पळे ही भूमिका बदलून या सीमेवर खिळे ठोकले असते तर तो देशात घुसला नसता
 •       शेतकरी देशद्रोही आहे का, देश ही तुमची खाजगी मालमत्ता नाही.
 •       शिवसेना स्वातंत्र्य लढ्यात नव्हती पण तुमची मातृसंस्थाही स्वातंत्र्य लढयात नव्हती
 •       शेतकऱ्यांना ताटकळत ठेवत असाल, त्यांच्या मार्गात खिळे ठोकत असाल तर देश तुमची खाजगी मालमत्ता नक्कीच नाही, आणि महाराष्ट्र तर नाहीच नाही

विकेल ते पिकेल

 •       पुढच्या वर्षी बाजारपेठेत कोणत्या पिकाला मार्केट असेल ते विचारात घेऊन दर्जेदार उत्पादन आणि हमी भाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे यासाठी विकेल ते पिकेल मध्ये काम
 •       विदर्भ माझं आजोळ, ते माझ्यापासून तोडण्याचा विचार सोडा. विदर्भाला वेगळे होऊ देणार नाही. ते आम्ही होऊ देणार नाही.
 •       स्मार्ट योजनेसाठी २१०० कोटी रुपये
 •       काम सुरु. बि पेरल्या पेरल्या झाड येत नाही. वेळ लागतो
 •       झाडासाठी खड्डे खणत बसला आणि झाडं लावत बसला सुधीर भाऊ तुम्ही
 •       बाळासाहेबांची आठवण तुम्ही वेळोवेळी काढली… त्यांना विसरला नाहीत. धन्यवाद. पण त्यांचे हिंदुत्व तरी विसरू नका. बाबरी पाडतांना येरेगबाळे पळून गेले… बाळासाहेब राहिले होते. शिवसेनाप्रमुखांनी म्हटलं जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली तर मलाअभिमान आहे. आणि हे म्हणाले आम्ही नाही पाडले
 •       राममंदिरासाठी आता घरोघर पैसे मागता… पण नाव मात्र आमचे राहिले पाहिजे हा आग्रह
 •       काश्मिर पंडित निर्वासित होऊन जगत होते तेंव्हा शिवसेनाप्रमुखांमुळे काश्मिरी पंडितांना हक्काचे स्थान मिळाले.
 •       आमचे हिंदुत्व काढत असतांना काश्मिरमध्ये फुटीरतावादांबरोबर सत्ता स्थापन केली तेंव्हा कुठे गेले होते तुमचे हिंदुत्व
 •       हिंदुत्वाच्या गप्पा आम्हाला शिकवू नका, तुम्ही त्याला पात्र नाही
 •       बाळासाहेबांच्या खोलीत बंद दरवाजाआड पुढच्या वाटचालीची चर्चा केली, तेंव्हा देवेंद्र तरी निर्लज्जपणाने आत ठरलेली गोष्ट बाहेर नाकारता, हे तुमचे हिंदुत्व,
 •       २०१४ ला युती तुम्ही तोडली, तेंव्हाही आम्ही हिंदु होतो, आज ही आहोत, उद्या ही राहू.
 •       सर्जल उस्मानी बद्दल बोलतांना आम्ही तो पाताळात गेलो तरी शोधून काढू म्हटले. उत्तरप्रदेशात अशा पिल्लावळीचे पोषण होत असेल आणि पाया ठिसुळ असेल तर मंदीर कसे बांधणार
 •       आम्ही उस्मानीला पकडणाच म्हणजे पकडणारच
 •       शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सौर कृषी वीज पंपाची योजना मोठ्याप्रमाणात राबवणार
 •       शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजना होती. कॅग चा रिपोर्ट काय सांगतो पहा, कॅगच्या अहवाल मानायचा नसेल तर ती रद्द करा
 •       केंद्राचा आर्थिक पहाणी अहवाल आपण मानतो, मग कॅगचा अहवाल का नाही
 •       मेट्रो तीनला स्टॅबलिंगलाईन नाही. खर्च वाढला आहे… याला स्थगिती नाही तरी किंमत १० हजार कोटी रुपयांनी वाढली.
 •       आम्ही काही ही केले नाही. पण खर्च करण्याआधी टेंडर काढण्याची परवानगी नको
 •       लाईन ६ चे टेंडर काढले पण डेपोच नाही म्हणजे कालवे आहेत आणि धरणेच नाहीत
 •       आरेची कारशेड काही वर्षांनी ती अपुरी पडणार, मेट्रो ४, ४ ए आणि ३ ची लाईन एकत्र करू या. त्यामुळे कल्याण डोंबिवली अंबरनाथपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढेल
 •       कांजूरमार्ग जागा केंद्र म्हणजे त्यांची, राज्य म्हणते त्याची… सीमा प्रश्नी जसे एकत्र येता तसे लोकहितासाठी एकत्र या, मेट्रो प्रकल्प दोन्ही सरकारचा तर खेचाखेची कशाला, एकत्र बसून मार्ग काढू
 •      खर्च ही आगडबंब होत नाही आणि जो खर्च होईल ती पुढच्या ५० वर्षापर्यंतची गरज भागवण्यासाठी होईल. कृपा करून यात राजकारण करू नका. मेट्रोत आपल्याला एकत्र जाण्याची संधी मिळेल

गुंतवणूक

 •       गुजरात महाराष्ट्रापेक्षा पुढे दिसते, तिथे होऊ द्या पण ती किती फसवी ते सांगतो
 •       नीती आयोगाच्या बैठकीत धोरण ठरवण्याचे पंतप्रधानांना आवाहन केले होते. राज्यातली स्पर्धा खड्डयात घालणारी
 •       गुजरात मध्ये आभासी गुंतवणूक. कंपनीचे शेअर घेतले ते उपभोक्ता कंपनीसाठी नाही
 •       गुजरातमध्ये जुलै २०२० ते सप्टेंबर २०२० या काळात १ लाख १६ हजार ५११ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात काही विदेशी कंपन्यांनी या कंपनीचे शेअर विकत घेतले आहेत. ही गुंतवणूक कंपनीमध्ये झाली आहे. उत्पादक उद्योगात नाही. हे येथे स्पष्ट करणे गरजेचे आहे.
 •        आमची गुंतवणूक प्रत्यक्ष
 •       चुकत असू तर नक्की वाभाडे काढा, चुकत असेल तर सांगा, पण महाराष्ट्राची बदनामी करू नका
 •       तुमच्याकडून राज्यात गुंतवणूक येत असेल तर तीही करायला हरकत नाही.
 •       शिवभोजन पाठ थोपटवून घेणारी नसली तरी पोट भरणारी योजना
 •       आमच्या योजनांचे वाभाडे काढले, गॅसच्या किंमती वाढल्या, उज्वला गॅस योजनेचे काय झाले
 •       खोट बोलून लाट येते, सत्ता येते पण ती टिकवणे कठीण
 •       विं. दा करंदीकर यांची कविता

प्रश्न विचारला तर तो देशद्रोही असूच शकेल असे नाही. ते अशिक्षित रांगडे असू शकता… दिल्लीच्या आसपास जे चालले ते का, तर त्यांची पिळवणूक सुरु आहे..

आम्ही ब्रम्हदेवाचा अवतार आहोत असा आमचा दावा नाही, जिथे कमी तिथे जरूर सुचना द्या

कठीण परिस्थिती जगभर. पण त्या कठीण परिस्थितीत अभिमान नसेल तर समाधान ठेवा

महाराष्ट्राचा अभिमान ठेवा

जे केले ते सगळेच शुन्य आहे असं समजू नका

शांतपणे ऐकू, समजून घेऊ, एकत्र काम करू… महाराष्ट्राला समृद्ध करू

- Advertisement -