Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईCAA - NRC विरोधात २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद

CAA – NRC विरोधात २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद

Prakash Ambedkar Dadar CAA NRC,Prakash, Ambedkar, Dadar, CAA, NRCमुंबई : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (CAA), आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरोधात देशात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवार (२४ जानेवारी ) रोजी मुंबईसह महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दादर येथील आंबेडकर भवनात आज वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली. या बैठकीनंतर आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बंदची घोषणा केली.

वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीला अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांनी बंदच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला. सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. देशात एनआरसी आणि सीएए विरोधात प्रचंड रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. जीएसटी, नोटबंदी आणि गैर विश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही. देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. या सर्वाला सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठीच महाराष्ट्र बंद पुकारण्यात येत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले. या बंदमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments