Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात 'या' नेत्यांना संधी ?

महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात ‘या’ नेत्यांना संधी ?

Mahavikasaghadi Opportunity for these leaders in the Cabinet of Maharashtraमुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात शिवसेना, काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि घटक पक्षांमधील कोणत्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. या बाबत काही नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्र विकास आघाडीचं मंत्रिपदाच्या वाटपाचा फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. गुरुवारी उध्दव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील त्यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील काही नेत्यांचा सुध्दा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळात शिवसेनेला १६ मंत्रिपद, राष्ट्रवादी उपमुख्यमंत्रीपदासह १४ आणि काँग्रेसला विधान सभेचं अध्यक्षपदास १२ मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात नेमका कुणाचा समावेश होणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

तिन्ही पक्षातील आमदरांच्या कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांचा मंत्रीमंडळात समावेश आहे का याचीच उत्सूकता लागलेली आहे. मात्र अद्यापही महाराष्ट्र विकास आघाडीकडून मंत्रिमंडळातील नेत्यांच्या नावाबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

तिन्ही पक्षातील संभाव्य ‘मंत्र्यांची’ नावे…

शिवसेना…

एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस…

जयंत पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील, राजेश टोपे, मकरंद पाटील, नवाब मलिक

काँग्रेस…

अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, के.सी. पडवी, सतेज पाटील आणि सुनील केदार, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments