Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यपाल भगतसिंह कोश्यारींच काम भाजपच्या मुखपत्राप्रमाणे : ममता बॅनर्जी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच काम भाजपच्या मुखपत्राप्रमाणे : ममता बॅनर्जी

mamata banerjee attacks on maharashtra governor
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुदतीपूर्वीच राष्ट्रपती राजवटीसाठी खेळी खेळली. याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोश्यारी यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडलं.

संविधानिक पदावरील काही लोक भाजपाच्या मुखपत्राप्रमाणे काम करीत आहेत, अशा शब्दांत ममता बॅनर्जींनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. बॅनर्जी म्हणाल्या, “अशा लोकांचा काही राज्यांमध्ये समांतर सरकार चालवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आमच्या राज्यातही हेच घडत आहे. काही नामनिर्देशित व्यक्ती आपल्या मर्यादित अधिकारांबाहेर जाऊन काम करीत आहेत. त्यांनी राज्यांवर अधिराज्य गाजवू नये, याची केंद्राने काळजी घ्यावी.”

पुढे त्या म्हणाल्या, माझ्या राज्यात देखील सध्या काय सुरु आहे हे तुम्ही पाहत आहात. त्यांना राज्यांमध्ये समांतर सरकार चालवायचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारे ही जनतेने निवडून दिलेली असतात. ही संसदीय पद्धत घटनेनुसार काम करते. राज्यातील सरकारांना त्यांची काम करु द्यायला हवीत असही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments