Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeदेशप्रियंका गांधींना दुचाकीवरून घेऊन जाणा-या आमदाराला दंड

प्रियंका गांधींना दुचाकीवरून घेऊन जाणा-या आमदाराला दंड

Priyanka Gandhi Lucknow,Priyanka, Gandhi, Lucknowलखनऊ : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान हिंसाचाराच्या आरोपाखाली दारापुरी यांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी जात होत्या. त्यावेळी उत्तरप्रदेश पोलिसांनी रोखले होते. त्यामुळे त्या राजस्थानचे काँग्रेस आमदार धीरज गुर्जर यांच्या सोबत दुचाकीवरून बसून जात होत्या. विना हेल्मेट दुचाकीवरून प्रवास केल्याबद्दल ६,३०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

काँग्रेसच्या १३४ व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित ‘संविधान बचाओ, देश बचाओ’ कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यासाठी प्रियांका गांधी लखनऊ येथे गेल्या होत्या. यानंतर माजी आयपीएस एस. आर. दारापुरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी त्या गेल्या होत्या. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान हिंसाचाराच्या आरोपाखाली दारापुरी यांना अटक करण्यात आली आहे.

दारापुरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जाताना प्रियांका गांधी यांनी दुचाकीचा वापर केला.

या प्रवासादरम्यान त्यांनी हेल्मेट परिधान केले नव्हते. काँग्रेस आमदार गुर्जर आणि नेत्या प्रियंका गांधी यांचे दुचाकीवरील छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि या दोघांवर कारवाई का करण्यात आली नाही, असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले. यानंतर लखनऊ वाहतूक पोलिसांनी ६,३०० रुपयांचे चलान कापले. वाहन परवाना नसणे, हेल्मेट न घालणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, गाडीची नंबर प्लेट कायद्यानुसार नसणे, चुकीच्या पद्धतीने वाहन हाकणे, अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments