Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमनसेचं इंजिन भाजपाच्या धार्मिक - व्देष एक्सप्रेस करिता भाड्यावर : सचिन सावंत

मनसेचं इंजिन भाजपाच्या धार्मिक – व्देष एक्सप्रेस करिता भाड्यावर : सचिन सावंत

Sachin Sawant MNS Maha morcha,Sachin Sawant, MNS Maha morcha,Sachin Sawant MNS, Maha morcha,Sachin MNS Maha morchaमुंबई : पाकिस्तानी- बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेने महामोर्चाकाढून शक्तीप्रदर्शन केलं. त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार टोला लगावला. भाजपच्या धार्मिक – व्देष एक्सप्रेस करिता मनसेने इंजिन भाड्यावर दिले. पण इथेही ते फेल होईल असे ट्विट सावंत यांनी केले.

काँग्रेस नेते सचिन सावंत मनसेवर तोफ डागली. राजकारण व्यवसाय समजला की भूमिका,झेंडे आणि भाषा बदलतेच! भूमिका केवळ वैयक्तिक नफा – नुकसान पाहून घेतल्या की मग मोर्चे काढा वा चिथावणीखोर भाषणे करा. जनतेच्या दृष्टीने त्यांची किंमत शून्य असते. भाजपच्या धार्मिक – व्देष एक्सप्रेस करिता मनसेने इंजिन भाड्यावर दिले पण इथेही ते फेल होईल असे ट्विट सावंत यांनी केले आहे.

मुंबईमध्ये पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्यासाठी आज मुंबईत (९ फेब्रुवारी) मोर्चा काढण्यात आला होता. राज ठाकरे म्हणाले, नागरिकत्व सुधारण कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात देशभरात जे मोर्चे काढले ती ताकद कुणाला दाखवली. मला आज पर्यंत कळलं नाही. मोर्चांना आज केवळ मोर्चाने उत्तर दिले आहे, मात्र हे मोर्चे सुरूच राहिले तर येत्या काळात दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments