Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रमनसे महामोर्चा : पाकिस्तानी – बांग्लादेशीयांनो…चले जाव!

मनसे महामोर्चा : पाकिस्तानी – बांग्लादेशीयांनो…चले जाव!

mns mahamorcha in mumbai today against pakistani-bangladeshi infiltrators
Image : MNS Adhikrut (twitter)

मुंबई : महाराष्ट्रातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांन विरोधात आज मनसेचा मुंबईत महामोर्चा होणार आहे. दुपारी १२ वाजता गिरगाव ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघणार आहे. यासाठी आझाद मैदानात मोठा स्टेजही बांधण्यात आला आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चासाठी राज्यभरातील मनसैनिक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत.

मनसेच्या या महामोर्चासाठी मुंबईतूनच नाही तर ठाणे, नवी-मुंबई, नाशिक, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्ते मुंबईत धडकणार आहेत. मुंबईतल्या नाक्यानाक्यांवर मनसेचे बॅनर लागले आहेत. राज्यभरातून 1 ते 2 लाख लोक मोर्चासाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसेनं राजकीय भूमिका बदलल्यानंतरचा हा पहिला मोर्चा असल्यानं त्याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. त्याचप्रमाणे राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे संपुर्ण महाराष्ट्राची नजर असणार आहे.

काळे आणि भगवे टी शर्ट

मनसेच्या मोर्च्यासाठी कार्यकर्त्यांसाठी भगव्या आणि काळ्या रंगाचे टी शर्ट छापण्यात आले आहेत. पदाधिकाऱ्यांसाठी कुर्तेही तयार करण्यात आले आहेत. रिस्ट बँडही तयार करण्यात आले आहेत. उद्याच्या मोर्च्यात मनसैनिकांच्या डोक्यावर गांधी टोपी दिसणार आहे. भगव्या रंगातल्या या टोपीवर राजमुद्रा आणि मनसेची निशाणी छापण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments