Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याफटका : मोबाइल इंटरनेट सेवा 'या' तारखेपासून महागणार

फटका : मोबाइल इंटरनेट सेवा ‘या’ तारखेपासून महागणार

mobile internet services price will be hike from this date
नवी दिल्ली : महागाई दिवसेंदिवस वाढत चालली असून, आता जनतेला पुन्हा मोबाइल इंटरनेट सेवेच्या दराचा फटका बसणार आहे. एअरटेल, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलने लवकरच आपला मोबाइल डाटाचे दर वाढवण्याची घोषणा केल्याने मोबाइल इंटरनेट सेवा महागणार आहे.

चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या तुलनेत सर्वात स्वस्त मोबाइल डेटा सेवा भारतात मिळत आहे. भारतीय बाजारात एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाची सर्वात जास्त भागीदारी आहे. दोन्ही कंपन्यांनी वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत १० अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. सुप्रीम कोर्टाने एका जुन्या प्रकरणावर सुनावणी करताना आदेश दिले होते की, टेलिकॉम कंपन्यांना ९० हजार कोटी रुपये सरकारला द्यावे लागणार आहे. यानंतर व्होडाफोनने नुकतेच सांगितले की, मोबाइल डेटा आधारित सेवेला वाढती मागणी असूनही भारतात सर्वात स्वस्त मोबाइल डेटा मिळतो आहे. व्होडाफोन आयडिया १ डिसेंबरपासून आपले टॅरिफचे दर वाढवणार असल्याने इंटरनेट सेवा महागणार आहे.

एअरटेलकडूनही याची घोषणा करण्यात आली आहे. जिओ आणि भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने याची घोषणा केली आहे. मोबाइल कंपन्या इंटरनेटचे दर वाढवणार असल्याने याचा फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments