Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईखासदार माजिद मेमन संजय राऊतांच्या मदतीला आले धावून...

खासदार माजिद मेमन संजय राऊतांच्या मदतीला आले धावून…

Majeed Memon Sanjay Raut,Majeed Memon, Sanjay Raut,Majeed, Memon, Sanjay, Rautमुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या भेटीगाठी होत होत्या. या वक्तव्यावरून संजय राऊतांना काँग्रेस नेत्यांनी कोंडीत पकडले होते. त्यानंतर संजय राऊतांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अॅड. माजिद मेमन धावून आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अॅड. माजिद मेमन यांनी मात्र राऊत यांच्या वक्तव्यात फारसं काही आक्षेपार्ह नसल्याचं म्हटलं आहे. मेमन यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. ‘संजय राऊत यांनी इंदिराजींचा अपमान केलेला नाही. उलट त्यांनी इंदिराजींची प्रशंसाच केलेली आहे. करीम लालाच्या संदर्भातील वक्तव्यावरून काँग्रेसनं फार आक्रमक होण्याची गरज नाही.

करीम लाला व हाजी मस्तानसारख्या गुंडाना सार्वजनिक माफी देण्यात आली होती, हे काँग्रेसनं विसरू नये, असं मेमन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. मात्र, संजय राऊतांनी तो वक्तव्य मागे घेतला असल्यामुळे वाद सध्यातरी शमला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments