Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबईत सुपर स्प्रेडर्सचा धोका, 150 विक्रेत्यांना कोरोना

मुंबईत सुपर स्प्रेडर्सचा धोका, 150 विक्रेत्यांना कोरोना

मुंबई l मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत तब्बल 150 विक्रेत्यांना कोरोनाची लागण  झाली आहे. हे सर्व विक्रेते मुंबईतील कोरोना सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मुंबईत कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे.

दिवाळीनंतर दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे आता धोका काही प्रमाणात वाढत चालला आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे पाहायला मिळत आहे.दिल्ली, गुजरात, राजस्थान या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, यासाठी सरकारकडून वारंवार प्रयत्न केला जात आहे.

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन जोरात कामाला लागली आहे. बाजारातील विक्रेत्यांद्वारे संक्रमण वाढू नये, यासाठी पालिकेने शोधमोहिम सुरु केली होती.
या पार्श्वभूमीवर मुंबईत दररोज 18 ते 19 हजार लोकांची आरटीपीसीआर आणि जलद चाचणी घेण्यात येत आहे. यात सर्वसामान्य नागरिक, दुकानदार, भाजीपाला, फळे आणि इतर विक्रेत्यांची जलद चाचणी केली जाते.

वाचा l  शेतकऱ्यांपेक्षा चीनवर बळाचा वापर केला असता तर चिनी सैन्य लडाखमध्ये घुसलं नसतं :शिवसेना

यानुसार गेल्या चार दिवसांत मुंबईच्या विविध बाजारपेठांमध्ये सुमारे 12 हजार दुकानदार, भाजीपाला, फळे आणि इतर विक्रेत्यांची जलद चाचणी घेण्यात आली. यात गेल्या पाच दिवसात 150 विक्रेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व विक्रेते मुंबईतील कोरोना सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 3000  चाचण्यांपैकी संभाव्य स्प्रेडर्सची चौकशी केली जात आहे. यामुळे मुंबईत कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments