Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर २७ जानेवारीपासून मुंबईत ‘नाईट लाईफ’ सुरु!

अखेर २७ जानेवारीपासून मुंबईत ‘नाईट लाईफ’ सुरु!

Anil Deshmukh Aaditya Thackeray,Anil Deshmukh, Aaditya Thackeray,Anil, Deshmukh, Aaditya, Thackeray

मुंबई : मुंबई २४ तास चालणार शहर आहे. २७ जानेवारीपासून मुंबई २४ तास ( मुंबई नाईट लाईफ) योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख आणि पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज बुधवार (२२ जानेवारी) पत्रकार परिषदेत केली.

आदित्य ठाकरेंनी सांगितले की, २४ तास दुकाने उघडे ठेवण्यासाठी दुकानदारांवर बंधने नाही. ज्यांना वाटते की आपला व्यवसाय होऊ शकतो ते आपली दुकाने व्यवसाय उघडे ठेवू शकतात. मॉल मिल कपाउंडमधील दुकाने उघडे राहणार आहेत. रहिवाशी भागात दुकाने उघडे राहणार नाही. यामुळे मुंबईच्या महसूल आणि रोजगारामध्ये वाढ होईल या मागचा हा संकल्प आहे. हा प्रस्ताव मागच्या सरकारमध्ये प्रलंबित होता. असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईहून रात्री बाहेरुन आल्यानंतर लोकांना जेवण मिळत नव्हतं. रात्री जर कुणी खरेदी विचार केला तर त्याला खरेदी करता येत नव्हतं. त्यामुळे २४ तास योजनेमुळे लोकांना फायदाच होईल. ज्या लोकांनी जीआर वाचला नाही ते लोक विरोध करत आहेत. काही लोक राजकारण म्हणूनही विरोध करत असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. पोलीस यंत्रणा, सुरक्षा सर्व बाबींचा विचार करुन निर्णय घेण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments