Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई पोलिसांच्या ताफ्यात 'ह्या' पथकाचा समावेश

मुंबई पोलिसांच्या ताफ्यात ‘ह्या’ पथकाचा समावेश

mumbai police : Maharashtra cabinet approves Police Horse Mounted Unit for Mumbai
Image Represented (PTI)

मुंबई : 26 जानेवारी पासून मुंबईच्या रस्त्यांवर अश्वारूढ पोलिस दिसणार आहेत. आक्रमक जमावावर नियंत्रण, गर्दीच्या ठिकाणी बारीक लक्ष, पेट्रोलिंग इत्यादीसाठी मुंबई पोलिस आता घोड्यांवरून गस्त घालताना दिसणार आहेत. असे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत अशी  माहिती दिली आहे.

ब्रिटीशकाळात मुंबई पोलिसांच्या ताफ्यात असे (युनिट) पथक कार्यरत होते व काही कारणांमुळे हे पथक बंद कराव लागले होते परंतु तब्बल 88 वर्षानंतर मुंबई पोलिसांच्या ताफ्यात ‘हॉर्स माउंटेड पोलिस युनिट’चा 26 जानेवारी 2020 पासून समावेश करण्यात येणार आहे. एक पोलिस उपनिरीक्षक ,एक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, चार हेड-कॉन्स्टेबल, बत्तीस पोलिस कॉन्स्टेबल व तीस घोडे अश्यांचा या युनिटमध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी पोलिसांना खास प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अश्वारूढ पोलिस युनिटमुळे आपत्कालीन स्थितीमध्ये तसेच एखाद्या कार्यक्रमामध्ये जमलेल्या गर्दीवर नजर ठेवणे सोयीचे जाते. भारतामधील चेन्नई, म्हैसूर, कोलकाता पोलिस देखील या युनिटचा वापर करतात. मॉस्को, न्यूयॉर्कसह अनेक शहरांचे पोलिसही अश्वांचा वापर करतात. त्याच पाश्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या 30 घोडे खरेदी करण्याचा प्रस्तावाला मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. सुरुवातीला क्लीन येथील कोळे कल्याण येथे या घोड्यांना ठेवण्यात येणार आहे. घोड्यांची देखभाल करण्याचे कंत्राट एखाद्या संस्थेला देण्यात येणार असून अश्व खरेदी आणि इतर सर्व प्रक्रियेसाठी अंदाजे 1 कोटी 75 लाख इतका खर्च अपेक्षित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments