Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्र...आता मुंबई पोलिसांच्या शरीरावर 'बॉडी वॉर्न कॅमेरा'!

…आता मुंबई पोलिसांच्या शरीरावर ‘बॉडी वॉर्न कॅमेरा’!

Mumbai Police Body Worn Camera,Mumbai Police, Body Worn Camera,Mumbai, Police, Body, Worn, Cameraमुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुमारे ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले.  मुंबई गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. मुंबई पोलिसांच्या शरीरावर ५०० कॅमेरे बसविण्यात येणार  असून ‘बॉडी वॉर्न कॅमेरा’ असं या कॅमेऱ्यांचं नाव आहे. पोलिसांच्या गाडीसमोरील काचेवर आणि गाडीवरही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमे-याबाबत लवकरचं निर्णय घेतला जाणार आहे.

कर्तव्यावर असणा-या पोलिसांच्या शरिरावर कॅमेरे असणार…

पोलिसांना घडणारा गुन्हा रोखता येणार असून गुन्हेगारांच्याही मुसक्याही आवळता येणार आहेत. मुंबईत कोणतंही मोठं आंदोलन, मोर्चा, मिरवणुका आणि सभा असतील तर त्यावेळी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांच्या शरीरावर हे बॉडी वॉर्न कॅमेरे बसविण्यात येतील. तसेच गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या शरीरावर हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्याने केवळ दिवसाच नाही तर रात्रीही रेकॉर्डिंग केली जाणार आहे.

कायं आहे या कॅमे-याचे फायदे ?

पोलिसांच्या शरीरावर हे बॉडी वॉर्न कॅमेरे बसविण्यात येतील. तसेच गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या शरीरावर हे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्याने केवळ दिवसाच नाही तर रात्रीही रेकॉर्डिंग केली जाणार आहे. या कॅमेऱ्यात वायफाय, जीपीएस, ब्लूटुथ सारख्या सुविधा असतील आणि हे कॅमेरे कँट्रोल रुमशी कनेक्ट असतील. केवळ गुन्ह्याचा तपास लावतानाच नव्हे तर पोलिसांवर जमावकडून होणारा हल्ला आणि वाहतुकीचं होणारं उल्लंघन आदी प्रसंगातही या कॅमेऱ्यांचा पोलिसांना फायदा होणार आहे.

पोलिसांच्या १०० गाड्यांच्या समोरील काचांवर डॅश कॅमेरे…

पोलिसांच्या १०० गाड्यांच्या समोरील काचांवर डॅश कॅमेरे लावण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यातून पळून जाणाऱ्या सर्व आरोपींची रेकॉर्डिंग केली जाणार आहे. पोलिसांच्या व्हॅन अथवा जीपवर हल्ला केल्यास त्याचीही रेकॉर्डिंग होणार आहे. हे कॅमेरे गाड्यांच्या टपावर लावण्यात येणार आहेत. हे कॅमेरे सुद्धा कंट्रोल रुमशी कनेक्ट राहणार आहेत. तणावाच्या काळात घटनास्थळी फौजफाटा पोहोचवण्याचा निर्णय घेतानाही या कॅमेऱ्यांचा उपयोग होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments