Friday, March 29, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रअहमदनगरमाझे वडील विलासराव देशमुख माझ्यासाठी हिरो : धीरज देशमुख

माझे वडील विलासराव देशमुख माझ्यासाठी हिरो : धीरज देशमुख

Dheeraj Deshmukh Vilasrao Deshmukh,Dheeraj Deshmukh, Vilasrao Deshmukh,Dheeraj, Deshmukh, Vilasraoअहमदनगर : माझे वडील माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे माझ्यासाठी हिरो आहेत. तर दोन्ही भावंड ना. अमित देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख हे माझ्यासाठी रोल मॉडेल आहेत. असं नवर्निवाचीत आमदार धीरज देशमुख यांनी मुलाखतीत सांगितलं. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित मेधा २०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संबोधित केले होते. या कार्यक्रमात मुलाखतकार अवधूत गुप्ते यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार धीरज देशमुख बोलत होते.

मुलाखतीत आमदार धीरज देशमुख मनमोकळेपणाने वडील विलासराव देशमुख यांच्याप्रमाणे प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी धीरज देशमुख म्हणाले, राजकारणात टिकणार की नाही हे जनता ठरवित असते. मी राजकारणात आलो, कुटुंबाचा जरी वारसा असला तरी मी प्रामाणिकपणे राजकारणात काम करत राहणार. मला पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासात पुन्हा १ नंबर राहिल. व मराठवाडा दुष्काळ मुक्त व्हावा अशी माझी इच्छा आहे असंही आमदार धीरज देशमुख म्हणाले.

संगमनेरमध्ये मेधा सांस्कृतिक महोत्सवात आज शुक्रवार (१७ जानेवारी) संवाद तरुणाईशी हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, आ. रोहित पवार, आ. धिरज देशमुख, आ. ऋतुराज पाटील, आ. झिशान सिद्दकी या तरुण आमदारांच्या मुलाखती गायक, संगीतकार अवधूत गुप्ते घेत आहेत. ह्या कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून होत आहेत. सर्व आमदारांच्या मुलाखती गायक व संगीतकार अवधूत गुप्ते घेत आहेत.

अमृतवाहिनीमधील भव्य क्रीडा संकुल व मेधा मैदानावर होत असलेल्या या युवा महोत्सवाचे जिल्ह्यातील व राज्यातील युवकांचे मोठे आकर्षण ठरले आहे. विद्यार्थ्यांसाठी मोठे सांस्कृतीक व्यासपीठ असलेल्या मेधा महोत्सवाचे उद्घाटन गुरुवार (१६ जानेवारी) सकाळी ११ वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री  बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, एबीबी कंपनीचे अध्यक्ष गणेश कोठावदे, विश्‍वस्त सौ. शरयुताई देशमुख, युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमातून तरुणांना प्रेरणादायी राजकीय वाटचाल व युवकांचे राजकारणातील महत्व याचा उलगडा होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments