Placeholder canvas
Friday, April 19, 2024
HomeदेशNamastey Trump: पंतप्रधान मोदी यांनी गळाभेट घेऊन केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत

Namastey Trump: पंतप्रधान मोदी यांनी गळाभेट घेऊन केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत

NamasteyTrump PM Modi grand welcomed US President Donald Trump upon his arrival in Ahmedabad अहमदाबाद : जगातील महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याचं अहमदाबाद विमानतळावर आगमन झाल आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदींनी प्रोटोकॉल मोडून त्याचं स्वागत केला आहे. त्यांच्या स्वागतासाठी गुजरातमधील अहमदाबादमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. भारत दौऱ्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब आले आहेत. वॉशिंग्टनमधल्या एअर बेसवरुन ट्रम्प यांच्या विमानानं उड्डाण घेतलंय होत तर सोमवारी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी डॉनल्ड ट्रम्प अहमदाबादला पोहचले आहेत.

दोन दिवसांच्या दौऱ्यात ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया आणि मुलगी इव्हांका ट्रम्प देखील उपस्थित आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज झालंय. विमानतळ ते मोटेरा स्टेडियम पर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी ‘नमस्ते ट्रम्प’चे बॅनर लावण्यात आले आहेत. ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत चोख बंदोबस्त लावण्यात आलाय. देशातील सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. ट्रम्प यांचं आलिशान आणि शाही स्वागत करण्यात आले आहे. त्यामुळे अख्ख्या जगाच्या नजरा भारताकडे लागल्या आहेत.


कसा असेल डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यक्रम ?

सोमवार
स. ११.४० । अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर आगमन
दु. १२.१५ । साबरमती आश्रमास भेट
दु. १.०० । मोटेरा क्रिकेट स्टेडियममध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम
दु. ३.३० । आगऱ्याकडे रवाना
सा. ५.३० । ताजमहालला भेट
सा.६.४५ । दिल्लीकडे प्रस्थान
सा. ७.३० । दिल्लीत आगमन

मंगळवार
स.१०.०० । राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभपूर्वक स्वागत
स.१०.३० । राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली
स.११.०० । हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट
दु. १२.४० । हैदराबाद हाऊसमध्ये करारांवर स्वाक्षºया व वृत्तपत्रांना निवेदन
सा. ७.३० । राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी भेट
रा. ८.०० । मायदेशाकडे प्रयाण

डोनाल्ड ट्रम्प हे भारताला भेट देणारे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत. याआधी प्रत्येकी पाच वर्षांच्या अंतराने अनुक्रमे बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश व बराक ओबामा या राष्ट्राध्यक्षांनी भारताचा दौरा केला होता. इतरांच्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यात दोन बाबतीत लक्षणीय फरक आहे. इतरांनी भारतासोबत पाकिस्तान किंवा शेजारच्या अन्य देशांनाही भेटी दिल्या होत्या. इतर राष्ट्राध्यक्षांचे दौरे शासकीय व राजनैतिक पातळीवरचे होते. मात्र डोनाल्ड ट्रम्प मात्र फक्त भारताचा दौरा करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments