मंत्रालयात आता एक दिवसाआड शिफ्ट; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचा निर्णय

- Advertisement -
new-shifts-in-maharashtra-government-one-day-work-and-one-day-off-shifts-in-maharashtra-governent-ministries-to-avoid-corona-spread-news-updates
maharashtra-budget-session-governor-bhagat-singh-koshyari-speech-in-assembly

मुंबई: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने मंत्रालयाच्या कामकाजात पुन्हा बदल घोषित केला आहे. यापूर्वी मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना गर्दी टाळण्यासाठी दोन शिफ्टमध्ये येण्यास सांगण्यात आले होते. आता मात्र नवीन आदेश काढून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना एका दिवसाआड बोलावण्यात येत आहे. कोरोना संसर्ग मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने म्हटले आहे.

सरकारकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, आप-आपल्या विभागातील कर्मचारी आणि अधिकारी कसे एक दिवसाआड येतील आणि त्यांच्या कामावर काही परिणाम होणार नाही याचे नियोजन करायचे आहे. यापूर्वी दोन शिफ्टमध्ये काम करत असल्यामुळे काही अडचणी येत होत्या. त्यामुळे आता सर्वांना एक दिवसाआड यावे लागणार आहे. त्या-त्या विभागातील सचिवांनी अशा प्रकारचे नियोजन करावे. तसेच जे कर्मचारी किंवा अधिकारी दिलेल्या शिफ्टमध्ये येण्यास असमर्थ ठरत असतील तर त्यांची त्या दिवसाची बिनपगारी सुटी गृहित धरली जाणार आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांत कमी झालेल्या कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. जवळपास नियंत्रणात आलेल्या कोरोनाने पुन्हा आपले डोके वर काढले आहे. त्यामुळे, मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली. यानंतर मुख्य सचिवांनी आठवड्यात एक दिवसाआड कामाचे नियोजन करणे किंवा आठवड्यातील 3-3 दिवस कामाची जबाबदारी द्यावी असे निर्देश दिले होते. त्यानंतर आता नव्याने आदेश जारी करण्यात आले आहेत.

 

- Advertisement -