Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रकोल्हापूरकोल्हापूर मनपाच्या महापौरपदी आघाडीच्या निलोफर आजरेकर

कोल्हापूर मनपाच्या महापौरपदी आघाडीच्या निलोफर आजरेकर

भाजपच्या उमेदवाराला फक्त १ मत

Kolhapur Nilofer Ajrekar,Kolhapur, Nilofer Ajrekar,Kolhapur Nilofer, Ajrekar,Kolhapur Ajrekarकोल्हापूर : महाराष्ट्र विकास आघाडीचे एका मागून एक धक्के सुरुच आहेत. कोल्हापूर महापालिकेमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीने भाजपाला धक्का दिला आहे. महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या निलोफर आजरेकर यांची निवड झाली आहे. विशेष म्हणजे भाजपाला केवळ एक मत मिळालं. त्यामुळे निलोफर या ४८ विरुद्ध एक अशा ४७ मतांच्या फरकांनी जिंकून आल्या आहेत.

भाजपा-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने भाजपाच्या उमेदवाराला केवळ एकच मत मिळाले. कोल्हापूर महाराष्ट्र विकास आघाडीतील पक्षांच्या एकीमुळे निलोफर या केवळ महापौरच झाल्या नाही तर त्यांना कोल्हापूरच्या ५० व्या महापौर होण्याचा मान मिळाला आहे. महाविकास आघाडीतील पक्षांचे संख्याबळ पाहता निलोफर यांचा विजय निश्चित मानला जात होता. भाजपा-ताराराणी आघाडीच्या अर्चना पागर यांना निवडणुकीमध्ये केवळ एक मत मिळालं. भाजपा-ताराराणी आघाडीचे नगरसेवक अनुपस्थितीत राहिले. भाजपाचे सदस्य असणारे कमलाकर भोपळेच मतदानाच्या वेळी सभागृहात उपस्थित होते. त्यांनीच पागर यांना मिळालेलं एकमेव मत दिलं. सभागृहामध्ये हात उंचावून मतदान घेण्यात आलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. सुरमंजिरी लाटकर यांनी अवघ्या सव्वा दोन महिन्यामध्ये आपल्या महापौरपदाचा राजीनामा दिल्याने महापौरपदाची निवडणुक घेण्यात आली. १९ नोव्हेंबर २०१९ रोजी महापौर म्हणून निवड झालेल्या लाटकर यांनी महापालिकेच्या विशेष सभेमध्ये राजीनामा दिला होता. कोल्हापूरमध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत महाविकास आघाडीचा पहिला यशस्वी पॅटर्न राबवत लाटकर यांना निवडून आणलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments