Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रनीरव मोदीचा महापालिकेला साडेनऊ कोटीचा चुना!

नीरव मोदीचा महापालिकेला साडेनऊ कोटीचा चुना!

Nirav Modi asset auction BMC,Nirav Modi, asset auction, BMC,Nirav, Modi, asset, auction

मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीने मुंबई महापालिकेचा साडेनऊ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. नीरव मोदीच्या मालमत्तेच्या लिलावातून मिळणा-या रकमेतून महापालिकेने वसूल करण्याचा दावा केला आहे.

मोदीच्या तीन मालमत्तांचा लिलाव करताना पालिकेला आपला थकीत मालमत्ता कर मिळावा, अशी विनंती प्रशासनाने अंमलबजावणी संचलनालयाकडे (ईडी) ने केली आहे. महापालिकेने २०१९-२०२० या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराये लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार महापालिकेने थकबाकीदारांकडून वसूल करण्याचा बडगा उगारला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments