Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeदेशनिर्भयाचे दोषी २० मार्चला फासावर लटकणार

निर्भयाचे दोषी २० मार्चला फासावर लटकणार

नवी दिल्ली : दिल्लीच्या निर्भया सामूहिक बलात्कार, हत्या प्रकरणातील दोषी शुक्रवार (२० मार्च) रोजी पहाटे ५:३० वाजता फासावर लटकणार आहेत. यापूर्वी तिन वेळा दोषींची फाशी टळली होती. आता नवीन डेथ वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

निर्भया हत्या प्रकरणात यापूर्वीच्या आदेशानुसार, चारही दोषींना मंगळवारी (३ मार्च) सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार होती. या चौघांच्या फाशीची अंमलबजावणी आतापर्यंत तिसऱ्यांदा पुढे ढकलली गेली आहे. त्यात दोषी पवन गुप्ता याने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती. त्यामुळे राष्ट्रपती निर्णय देईपर्यंत फाशीची अंमलबजावणी होऊ शकत नाही, असा निर्णय अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेद्र राणा यांनी दिला होता. त्यामुळे आता चौथ्यांदा नवीन डेथ वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

मुकेश कुमार सिंह (३२), पवन गुप्ता (२५), विनय कुमार शर्मा (२६) आणि अक्षय कुमार सिंह (३१) या चौघांविरुद्ध नव्याने ‘डेथ वॉरंट’ जारी झालं असून चारही दोषी २० मार्च रोजी फासावर लटकणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments