Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशनिर्भया बलात्कारातील आरोपीची फाशी कायम

निर्भया बलात्कारातील आरोपीची फाशी कायम

Nirbhaya Rape Case accused hanging punishment remain sameनवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील एका आरोपीच्या पुनर्विचार याचिकेवर आज बुधवारी सुनावणी करण्यात आला. दरम्यान, आरोपी कोणत्याही प्रकारच्या दयेसाठी पात्र नाहीत. त्यांना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने आरोपीची पुनर्विचार याचिका फेटाळत त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.

यावेळी पुनर्विचार याचिका दाखल केलेल्या आरोपीच्या वकीलांनी या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावेळी त्यांनी तिहार तुरूंगाचे तुरूंग अधीक्षक सुनिल गुप्ता यांच्या पुस्तकाचा उल्लेखही करण्यात आला. त्याच्या वकीलांनी पुस्तकाचा उल्लेख करत एका आरोपच्या आत्महत्येवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावेळी न्यायालयानंही यावर प्रतिक्रिया देत ट्रायल पूर्ण झाल्यानंतर यावर पुस्तक लिहिणं हा गंभीर ट्रेंड असल्याचं म्हटले. आरोपी कोणत्याही प्रकारच्या दयेसाठी पात्र नाहीत. त्यांना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे केली होती.

युक्तीवादादरम्यान आरोपीच्या वकीलांनी टेस्ट इन परेडवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला. दरम्यान, न्यायमूर्ती भानुमती यांनी हा मुद्दा ट्रायलदरम्यानही विचारात घेतला होता का? असा प्रश्न विचारला. यावेळी आरोपीच्या वकीलांनी हा नवा मुद्दा असल्याचं न्यायालयाला सांगितलं. सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही पक्षांना युक्तीवादासाठी अर्ध्या अर्ध्या तासाची वेळ दिली होती. देशामध्ये अनेक लोकांच्या फाशीच्या शिक्षा प्रलंबित आहे. अशात दया याचिकेसाठी अर्ज केल्यानंतरही फाशीच्या शिक्षेसाठी घाई का केली जात आहे, असा सवाल आरोपीच्या वकीलांनी न्यायालयाकडे केला. तसंच या प्रकरणातील मुख्य साक्षीदारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत याप्रकरणात सादर करण्यात आलेले पुरावेही विश्वास ठेवण्यासारखे नसल्याचं त्यांनी म्हटलं.

मी गरीब आहे म्हणून मला फाशीची शिक्षा दिली जात आहे…

मी गरीब आहे म्हणून मला फाशीची शिक्षा दिली जात आहे, असं दोषीनं आपल्या वकीलांमार्फत न्यायालयाला सांगितलं. तसंच सर्व राजकीय अजेंड्यानुसार होत असल्याचंही वकीलांकडून सांगण्यात आलं. युक्तीवादादरम्यान आरोपीच्या वकीलांनी वेद, पुराण आणि त्रेता युगाचा उल्लेख केला आणि कलियुगात लोक केवळ ६० वर्ष जगतात परंतु अन्य युगांमध्ये लोक जास्त जगतात, असंही म्हटलं. दरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आरोपींची पुनर्विचार याचिका रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. या प्रकरणी कनिष्ठ न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. त्यामुळे पुनर्विचार याचिकाही रद्द केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कोणताही उशिर न करता या प्रकरणाचा दिला पाहिजे. आरोपी कोणत्याही प्रकारच्या दयेसाठी पात्र नाहीत. त्यांना फाशीचीच शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी मेहता यांनी न्यायालयाकडे केली होती. अखेर त्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments