Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यानारायण राणेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही : अजित पवार

नारायण राणेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही : अजित पवार


मुंबई : भाजपाचं सरकार कसं आणायचं याची तयारी आम्ही सुरु केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी माझ्या खांद्यांवर टाकली आहे असा दावा भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी केला होता. त्याबाबत राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी राणेंच्या दाव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे सांगितले.

आज वाय. बी. सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होत आहेत. बैठक सुरु होण्यापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना राणेंच्या विधानाचा समाचार घेतला. तिन्ही पक्षांमधील कॉमन मिनीमम प्रोग्राम ठरवलं जाणार आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रिया सुर आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

काल महाराष्ट्रात राज्यपटी राजवट लागू झाल्यानंतर राज्यसभा खासदार राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मी देवेंद्र फ़डणवीस यांच्याशी भेटून आलो. मी भाजपची सत्ता कशी आणायची याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे असं सांगितलं होतं. त्यामुळे चर्चेंना उधाण आलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments