Friday, March 29, 2024
Homeमुख्य बातम्याअयोध्या निकालानंतर कोणीही कायदा हातात घेऊ नये : शरद पवार

अयोध्या निकालानंतर कोणीही कायदा हातात घेऊ नये : शरद पवार

No one should take law in hand after Ayodhya result: Sharad Pawar
मुंबई : रामजन्मभूमी मंदिर, बाबरी मशीद जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. जो निकाल येईल तो सर्वांनी मान्य करावं. कोणीही कायदा हातात घेऊ नये. देशात शांतता ठेवावी, असे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुंबई येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

पवार पुढे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला आहे. केंद्राने तातडीने मदत करण्याची गरज आहे. शेतक-यांना विशिष्ट रकमेपर्यंत मदत करावी. शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतक-यांनी नव्याने कर्ज पुरवठा करावा. अशी मागणी पवारांनी केंद्र सरकारकडे केली.

मंगळवारी काँग्रेस महाआघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन शेतक-यांना तातडीने मदत करण्याची भूमिका मांडली आहे. केंद्राने तात्काळ मदत करावी असेही पवार यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments