Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeदेशआता गॅस सिलिंडरसाठी ८२९ रुपये मोजावे लागणार!

आता गॅस सिलिंडरसाठी ८२९ रुपये मोजावे लागणार!

lpg cylinder price,lpg, cylinder, price,non subsidised,subsidised,subsidyनवी दिल्ली : महागाईने सर्वसामान्य जनतेचं कंबरड मोडलेलं असताना गॅसच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसला आहे. आजपासून महानगरांमध्ये विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या नव्या किमती लागू झाल्या आहेत. त्यानुसार मुंबईत गॅसच्या किमती १४५ रुपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळं आता एका गॅसमागे सर्वसामन्यांना ८२९.५० रुपये मोजावे लागणार आहे.

काही दिवसांपासून गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत सर्वसामन्यांचे जेवण महागणार आहे. त्यामुळं आता सर्वसामन्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. दिल्लीतील सिलिंडरच्या किमती आता १४४.५० रुपयांनी वाढून ८५८. ५० रुपये झाली आहे. तर, कोलकातामध्ये १४९ रुपयांची वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये १४७ रुपयांची वाढ झाली असून गॅसच्या किमती या ८८१ रुपये झाल्या आहेत.

सध्या सरकार एका घरात प्रत्येक घरासाठी १४.२ किलोचे १२ सिलिंडर्स अनुदान देते. जर तुम्हाला यापेक्षा जास्त सिलिंडर हवे असतील तर तुम्हाला बाजारभावाने खरेदी करावी लागेल. सरकार दरवर्षी १२ सिलिंडरवर दिले जाणारे अनुदान असले तरी याची किंमत देखील दरमहा महिन्यात बदलत असते. सरासरी आंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि परकीय चलन दरात बदल यासारख्या घटक अनुदानाची रक्कम निश्चित करतात. मात्र, गॅसच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांना त्याचा फटका बसला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments