Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रएनआरसी कायद्यातून संविधान बदलण्याचा घाट; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

एनआरसी कायद्यातून संविधान बदलण्याचा घाट; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

Prakash Ambedkar-Narendra Modi

औरंगाबाद : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन (एनआरसी) सारखे कायदे आणून संविधान बदलण्याचा घाट घातला जात आहे. असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन (एनआरसी) सारखे कायदे आणून मतदान मजबूत करण्याचा डाव आहे. यातून भटक्या विमुक्त लोकांना फटका बसेल. या कायद्यामुळे आदिवासींना त्रास होणार आहे. धनगर समाजातील मेंढपाळ समुहासोबत इतर अनेक समुहांना याचा त्रास होणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला तर 40 टक्के लोकांची माहिती मिळू शकणार नाही. त्यामुळं हे सगळे लोक रस्त्यावर येणार आहेत, असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बेळगाव प्रश्नावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “बेळगाववरुन आज पुन्हा वाद सुरू आहे. मात्र, बेळगाव महाराष्ट्रात राहील की आणि कर्नाटकात राहील याने मला काहीही फरक पाडत नाही. तो भारतात आहे हे महत्त्वाचं. तिथल्या लोकांचं मत वेगळं आहे. हे मत मी जाणून घेतलं आहे.” यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा 5 वर्षांमध्ये कोरा करावा, अशी मागणी यावेळी प्रकाश आंबेडकरांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments