Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमुख्य बातम्याखडसेंसोबत ओबीसी, धनगरनेत्यांची गुफ्तगू

खडसेंसोबत ओबीसी, धनगरनेत्यांची गुफ्तगू

OBC, dhangar leaders discuss with Eknath Khadseमुंबई : ओबीसी, धनगर समाजाच्या नेत्यांमध्ये भाजपाबद्दल खदखद सुरु आहे. सर्व धनगर, ओबीसी नेते भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या भेटीसाठी मुंबईतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. यामुळे भाजपच्या चिंतेत वाढ झाली आहे.

धनगर नेते माजी आमदार प्रकाश शेंडगेंसह इतर नेत्यांची खडसेंच्या निवासस्थानी बैठक सुरु झाली आहे. खडसेंना डावल्यामुळे तसेच मुलीच्या पराभानंतर खडसे भाजप पक्षश्रेष्ठीवर नाराज आहेत. बुधवारी त्यांनी भाजपच्या पराभवाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. बुधवारी खडसेंनी पंकजा मुंडे, विनोद तावडेंशी चर्चा केली होती. भाजपचे ओबीसी, धनगरसमाजाचे नेते भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे.

भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे या पराभवामुळे भाजपवर नाराज असून, त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. पंकजा मुंडे या विधानपरिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी आग्रही आहेत. त्यामुळे दबावतंत्राचं राजकारण करत असल्याची चर्चा सुरु आहे. खडसे, तावडे, मुंडे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments