Friday, March 29, 2024
HomeदेशVideo : घरात नसताना दगड - पेट्रोल बाँम्ब विरोधकांनी छतावर ठेवले; आपच्या...

Video : घरात नसताना दगड – पेट्रोल बाँम्ब विरोधकांनी छतावर ठेवले; आपच्या नगरसेवकाचा खुलासा

High alert in Mumbai after of Delhi violenceनवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील खजुरी येथे हिंसाचार भडकावण्यामध्ये आपचे नगरसेवक ताहिर हुसैन यांच्याकडे संशयाची सुई जात आहे. त्यांच्या घराच्या छतावर पेट्रोल बॉम्ब, गावठी कट्टे, गलोल आणि एका ट्रेमध्ये मोठे दगड आढळून आले आहेत. त्याबाबत नगरसेवक ताहिर हुसैन यांनी मोठा खुलासा केला. आम्ही घरात नसताना घराचं दार तोडून विरोधकांनी छतावर हे साहित्य आणून ठेवले असा खुलासा व्हिडीओतून करण्यात आला आहे.

आपचे नगरसेवक ताहिर यांनी सर्व आरोप फेटाळले असून आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आम आदमी पार्टी आता ताहिर यांच्या बचावासाठी पुढे आली असून याप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. आप खासदार संजय सिंह यांनीही चौकशीची मागणी केली आहे.

पोलिसांनी कुटुंबियांना घरातून सुरक्षितस्थळी जाण्याचा दिला होता सल्ला…

पोलिसांनी आमच्या कुटुंबियांना घर सोडून सुरक्षितस्थळी जाण्यासाठी सूचना केल्या होत्या. मी पोलिसांना सांगितलं होतं पोलिसांनी घरावर बंदोबस्त लावला होता. आमच्या घराची तपासणी केली होती. नंतर पोलिसांनी बंदोबस्त काढला. जी भिती होती तेच घडलंय. दंगोखोरांनी घराचे दार तोडून सर्व साहित्य छतावर ठेवले. त्यावेळी आम्ही घरात नव्हतो. मी सच्चा मुस्लीम असून असे कृत्य मी करु शकत नाही. हिंदू- मुस्लिम समाजात मी कित्येक वर्षापासून काम करतो. हा संतापजन प्रकार घडला त्याचं मला दु:ख होत आहे. असा खुलासा आपचे नगरसेवक ताहिर हुसैन यांनी केला आहे.

छतावर सापडले दगड आणि पेट्रोल बॉम्ब

आता दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर जेव्हा काही माध्यमांचे प्रतिनिधी या घरावर गेले तेव्हा त्यांना तिथे या सर्व गोष्टी आढळून आल्या. यामध्ये दगड आणि काही दगडांचा भुगाही होता. जसे विटा फोडून त्याचे छोटे तुकडे करण्यात आले आहेत. पेट्रोल भरुन त्यावर कपडा लावलेल्या कोल्ड्रींकच्या बाटल्याही इथे आढळून आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments