Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात 22,118 खोल्यांसह 55,707 खाटांची सोय : अशोक चव्हाण

महाराष्ट्रात 22,118 खोल्यांसह 55,707 खाटांची सोय : अशोक चव्हाण

Over 55,000 beds ready in maharashtra for COVID-19 patients: Ashok Chavanमुंबई : कोरोनाचा थैमान वाढत चालला आहे. कोरोनाविरूद्धच्या लढाईत खबरदारीची उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राज्यभरात तब्बल 22 हजार 118 खोल्या उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या खोल्यांमध्ये जवळपास 55 हजार 707 खाटांची सोय होऊ शकणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.

या इमारतींचा राहणार समावेश…

अशोक चव्हाण म्हणाले, “कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाले आहे. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. मात्र, गरज भासलीच तर राज्य सरकारने सर्व प्रकारची तयारी केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या शेकडो शासकीय इमारतींमधील 22 हजार 118 खोल्या प्रशासनासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये विश्रामगृहे, वसतीगृहे, नवीन बांधकाम झालेल्या मात्र अद्याप लोकार्पण न झालेल्या शासकीय इमारती आदींचा समावेश आहे.”

या ठिकाणी वीज, पाणी अशा सुविधा देखील उपलब्ध असतील. या खोल्यांचा वापर विलगीकरण आणि तात्पुरत्या स्वरुपातील रूग्णालय म्हणून केला जाऊ शकतो. आपात्कालीन यंत्रणेने यातील अनेक इमारतींचा वापर देखील सुरू केला आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हे कर्मचारी हवे त्यावेळी उपलब्ध असतील, अशीही माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments