Friday, March 29, 2024
Homeमुख्य बातम्यापी. चिदंबरम 106 दिवसानंतर तुरुंगातून बाहेर

पी. चिदंबरम 106 दिवसानंतर तुरुंगातून बाहेर

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज बुधवारी सुप्रीम कोर्टाने अखेर जामीन मंजूर केला आहे. दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर पी. चिदंबरम यांना हा जामीन मिळाला आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआय आणि ईडीने वेगवेगळे खटले दाखल केले होते. पूर्वीच एका प्रकरणात त्यांनी जामीन मिळाला होता. संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत होते. आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआय आणि ईडीने वेगवेगळे खटले दाखल केले होते. परदेशात जाण्याची परवानगी नसेल असेही कोर्टाने म्हटले आहे. शिवाय बोलावल्यानंतर वेळोवेळी त्यांना चौकशीसाठी हजरही राहावे लागणार आहे. पी. चिदंबरम २४ ऑक्टोबरपर्यंत ईडीच्या कोठडीत होते. सीबीआयने पी. चिदंबरम यांना २२ ऑगस्टच्या रात्री जोरबाग येथील निवासस्थानावरून अटक करण्यात आली होती.

दिल्ली हायकोर्टाने आयएनएक्स मीडियाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात पी. चिदंबरम यांना जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर चिदंबरम यांनी हायकोर्टाच्या या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. यावर १८ ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला. सध्या चिदंबरम २४ ऑक्टोबरपर्यंत ईडीच्या कोठडीत असून ते सीबीआयने दाखल केलेल्या एका प्रकरणातही २४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत होते.

त्या प्रकरणावर एक नजर…

२००७ मध्ये पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना अर्थमंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने आयएनएक्स मीडियाला ३०५ कोटी रुपयांचा परकीय निधी स्वीकारण्यास मंजुरी दिली होती. या मंजुरीत अनियमितता आढळून आल्याने त्या आधारावर १५ मे २०१७ रोजी सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी २१ ऑगस्ट रोजी चिदंबरम यांना दिल्लीतील जोरबाग येथील निवासस्थानातून सीबीआयने अटक केली होती. सीबीआयच्या ताब्यात असतानाच चिदंबरम यांना ईडीने अटक केली असून सध्या ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. दुसरीकडे दिल्ली हायकोर्टाने जामीन नाकारल्यानंतर त्याला चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. अखेर त्यांना आज जामीन मिळाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments