Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रविठ्ठल मंदिरात आजपासून मोबाईल बंदी

विठ्ठल मंदिरात आजपासून मोबाईल बंदी

Pandharpur : Mobile phone ban on Vitthal temple from todayपंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आज १ जानेवारी पासून मंदिरात मोबाईल बंदीचा निणर्य घेतला आहे. या करीता समितीने स्वतंत्र लॉकरची व्यव्यस्था केली असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठ्ल जोशी यांनी माध्यमांना दिली आहे. मंदिरात कुणी मोबाईल आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

या कारणामुळे घेतला निर्णय…

मंदिर समितीने एक जानेवारी पासून मोबाईल बंदीचा निर्णय घेतला आहे. मंदिरात आल्यावर भाविक देवाचे, मंदिरात फोटो काढणे, मोबाईलवर बोलणे या सारखे प्रक्रार होऊ लागले. यामुळे आजपासून मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी घातली आहे. भाविकांचे मोबाईल ठेवण्यासाठी नामदेव पायरी जवळील संत ज्ञानेश्वर मंडप येथे ६०० लॉकरची व्यवस्था केली आहे. यासठी नाममात्र दोन रुपये आकारले जाणार आहेत.तसेच काही भाविकांचा मोबाईल नजरचुकीने बरोबर आला तर मंदिरात प्रवेश करतात त्या ठिकाणी २५० लॉकरची व्यवस्था केली आहे. येणार्या भाविकांनी समितीला सहकार्य करावे असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे. कुणी मोबाईल आणला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे मंदिर समितीने सांगितले आहे.

पंढरपूर येथे या वर्षी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मंदिर समितीने मंदिराला आकर्षक फुलांची सजावट केली. ब्ल्यू डायमंड या फुलांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सोळखांबी, प्रवेशद्वार आदी ठिकाणी आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments