Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईपंकजा मुंडेंनी कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी दिला ‘हा’ सल्ला!

पंकजा मुंडेंनी कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी दिला ‘हा’ सल्ला!

bjp pankaja munde gopinath gad beed parliमुंबई : पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भाजपच्या नेत्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी ट्विटव्दारे विविध सल्ले दिले आहेत.

कोरोनामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सरकारकडून नागरिकांच्या काळजीसाठी दक्षता घेतली जात आहे. मात्र पुण्यामध्ये सापडलेल्या कोरोना बाधिक पाच नागरिकांच्या रिपोर्टनंतर आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी कोरोनावर  पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे करोनाची बाधा ज्या भागातील नागरिकांना झाली आहे, तेथील नागरिक अधिकच चिंतेत असल्याचेही दिसून येत आहे. भाजपाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी करोनाचा फैलाव रोकण्यासाठी काय करता येईल यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. पंकजा यांनी केलेल्या ट्विटमध्ये केवळ मास्क घालणे गरजेचे नसून शक्य तितक्या लोकांना घरुन काम करण्यास सांगायला पाहिजे असं म्हटलं आहे. “करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी केवळ मास्क पुरेशे नाही. तापमान वाढत नाही तोपर्यंत जिथे शक्य आहे तिथे लोकांना घरुन काम करायला सांगण्यास काय हरकत आहे. करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी परीक्षेचा कालावधी वगळता शाळा-कॉलेजेसचा सुट्टी दिल्यास काय हरकत आहे. कमी लोकं बाहेर पडले तर कमी गोंधळ होईल आणि यंत्रणांना काम करणे सोप्प जाईल,” असं ट्विट पंकजा यांनी केलं आहे.

पुणे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. शिवाय, आरोग्य विभागामार्फत विशेष खबरदारी घेतली जात आहे. पुण्यात ज्या भागातील रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या भागातील शाळांना रविवारपर्यंत सुट्टी देण्याचा निर्णय स्थानिक शाळा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. याबाबात पालकांना देखील कळवण्यात आले आहे. त्यातच राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनीही सरकार करोनाचा फैलाव रोकण्यासंदर्भात महत्वाचे निर्णय घेईल अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments