Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याअरबी समुद्रात २४ तासांत 'पवन' आणि 'अम्फन' चक्रीवादळं धडकणार

अरबी समुद्रात २४ तासांत ‘पवन’ आणि ‘अम्फन’ चक्रीवादळं धडकणार

pawan and Amphone two cyclones in arabian sea expect rain in mumbai pune nashikमुंबई : अरबी समुद्रामध्ये आगामी २४ तासांत ‘पवन’ आणि ‘अम्फन’ ही दोन चक्रीवादळं निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई, पुणे व नाशिक या प्रमुख शहरांमध्ये आज गुरुवारी पाऊस पडण्याची शक्यता ‘स्कायमेट’ने वर्तवली आहे.

मुंबई उपनगरात आज गुरुवारी सकाळपासून हलका पाऊस पडला. मुंबईकरांना ऐन हिवाळ्यात छत्री घेऊन घराबाहेर पडावं लागत असल्याचं चित्र आज पहायला मिळत आहे. हवामान खात्याकडून मुंबई शहरासह उर्वरीत महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. अरबी समुद्रामध्ये आगामी २४ तासांत ‘पवन’ आणि ‘अम्फन’ ही दोन चक्रीवादळं निर्माण होण्याची शक्यता आहे.

पूर्व मध्य अरबी समुद्रात आणि दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावी क्षेत्राचे रूपांतर गुरुवारी दुपारपर्यंत चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत अरबी समुद्रात एकाच वेळी दोन चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या काळात किनारपट्टीवर ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज गुरुवारी मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.

कयार आणि महा चक्रीवादळांनंतर पुन्हा तशीच स्थिती अरबी समुद्रात निर्माण झाली आहे. यंदा अरबी समुद्रात चार, तर बंगालच्या उपसागरात तीन अशी सात चक्रीवादळांची निर्मिती झाली. त्यात पवन व अम्फन यांची भर पडल्यास एकूण चक्रीवादळांची संख्या नऊ होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments