Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात 'या' कारणामुळे पेट्रोल-डिझेलचा दर वाढणार

महाराष्ट्रात ‘या’ कारणामुळे पेट्रोल-डिझेलचा दर वाढणार

Ajit Pawar Petrol Price Hike,Ajit Pawar, Petrol Price Hike,Ajit, Pawar, Petrol, Price, Hikeमुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सादर केला. याचवेळी इंधनावरील कर वाढवल्याचीही घोषणाही पवारांनी केली. राज्यामध्ये पेट्रोल-डिझेल प्रती लिटर एक रुपयांनी वाढले आहे. मात्र ही करवाढ का करण्यात आली याचे स्पष्टीकरण पवारांनी पत्रकारांशी बातचीत करताना सांगितले.

वातावरण बदल हा भविष्यातील खूप मोठ प्रश्न असून त्यासंबंधित काम करण्यासाठी शासनाला निधीची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या तसेच शहरांच्या दृष्टीने महत्वाची अशी अनेक पर्यावरण पुरक कामे हाती घेतली जाणार आहेत. असं पवारांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. अतिरिक्त विशेष समर्पित निधीची आवश्यकता राज्य शासनाला आहे. राज्यामध्ये वेगवेगळ्या हरित योजना राबवण्यासाठी सध्या इंधनावर असणाऱ्या करामध्ये प्रती लिटर एक रुपयाने वाढवून मुल्यवर्धित कर आकारण्याचा प्रस्ताव मांडत आहे,” असं पवारांनी स्पष्ट केलं.

दरवाढीमुळे काय होणार ?

इंधनाचे दर प्रती लिटर एक रुपयाने वाढवल्याने राज्य सरकारला १८०० कोटी इतका अतिरिक्त महसूल मिळेल अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली आहे. “इंधनावरील मुल्यवर्धित कर वाढवल्याने शासनास सुमारे १८०० कोटी इतका अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे. हा निधी वातावरण बदलासंदर्भातील वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी वापरला जाणार आहे. हरित निधी पर्यावरण संवर्धन व जतनाचे मलनिस्सारण आणि घनकचरा व्यवस्थापन असे कार्यक्रम हाती घेणार आहे,” असं पवारांनी अर्थसंकल्प मांडता स्पष्ट केलं.

त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला

राज्याला ग्रीन सेज फंडांची आवश्यकता आहे. त्यामुळे इंधन दरवाढ करण्यात आली असल्याचे पवारांनी स्पष्ट केलं. “बाजूच्या राज्यात बघतीलं तर कालच कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर आपल्यापेक्षा जास्त वाढवले आहेत. तिथं भाजपाचं सरकार आहे. त्यांच्याकडे दर आपल्यापेक्षा जास्त झालेले आहेत. मात्र त्याचं झालं म्हणून आपलं झालं पाहिजे असा माझा दृष्टीकोन नाही. पण ग्लोबल वॉर्मिंगचं संकट, अवकाळी पाऊस, गारपीट अशा सतत काही ना काही नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडतातय. आधीच्या पिढीने योग्य पावले उचलली असती तर आमच्यावर हे संकट आलं नसतं असा दोष पुढच्या पिढीनं आम्हाला देता कामा नये यासाठीच सरकारने काळजी घेतली आहे. प्रत्येक विभागाला दिलेल्या उद्दिष्ठापेक्षा जास्त रक्कम कशी मिळेल यासंदर्भात सरकारचा प्रयत्न राहिलं,” असं पवारांनी या दरवाढीचं समर्थन करताना स्पष्ट केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments