खळबळजनक! औरंगाबादेत कोरोनाची लस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

- Advertisement -
policeman-who-was-vaccinated-against-corona-in-aurangabad-has-died
policeman-who-was-vaccinated-against-corona-in-aurangabad-has-died

औरंगाबाद : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाचं प्रमाण वाढत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही करण्यात आलाय. विशेष म्हणजे वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या मोहिमेलाही वेग आलाय. फ्रंटलाईन वर्कर आणि वैद्यकीय कर्मचारी, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जात आहे. आता औरंगाबादेत कोरोनाची लस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडालीय.

आठ दिवसांपूर्वी घेतली कोरोनाची लस 

औरंगाबादेतील एका पोलिसांनं आठ दिवसांपूर्वी कोरोनाची लस घेतली होती. कर्तव्यावर असताना श्वास घेण्यास त्या पोलिसाला अडचण येत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, अखेर उपचारादरम्यान त्या पोलीस हवालदाराचा मृत्यू झालाय. भास्कर शंकर मेटे हे पोलीस हवालदार बेगमपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

- Advertisement -

सिटी स्कॅनमध्ये आढळली कोरोनाची लक्षणे

कर्तव्यावर असताना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. सिटी स्कॅनमध्ये कोरोनाची लक्षणेही आढळली होती. आता हर्सूल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय. 13 फेब्रुवारीला कोरोना लसीचा पहिला डोस त्या पोलीस हवालदारानं घेतला होता, अखेर त्या पोलिसाचा मृत्यू झालाय.

औरंगाबादेत रिक्षाचालक विनामास्क वाहन चालवताना आढळला तर त्याची रिक्षा जप्त

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता औरंगाबाद शहरात रिक्षाचालक विनामास्क वाहन चालवताना आढळला तर त्याची रिक्षा (Autrikshaw) जप्त केली जाईल. या निर्णयाचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

औरंगाबादमध्ये तब्बल 35 हजारांपेक्षा जास्त रिक्षाचालक असून ते दररोज प्रवाश्यांना घेऊन शहरातील गल्लोगल्ली आणि इतरत्र फिरत असतात. त्यांनी मास्क न परिधान केल्यास कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाकडून लोकांना वारंवार मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, लोक या सूचना गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

होम आयसोलेशन पर्याय आता बंद

कोरोना बाधितांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता औरंगाबाद महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधितांची संख्या ही आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अनेक कोरोना रुग्णांच्या घरातील लोकांनाही व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेच्या वतीने होम आयसोलेशन पर्याय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

- Advertisement -