पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला; मृत्यूचं ‘हे’ आहे कारण

- Advertisement -
pooja-chavan-suicide-case-wanwadi-police-received-post-mortem-report-says-severe-injury-was-the-cause-of-death
pooja-chavan-suicide-case-wanwadi-police-received-post-mortem-report-says-severe-injury-was-the-cause-of-death

पुणे: टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. पूजा चव्हाणचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा वैद्यकीय अहवाल पुण्यातील वानवडी पोलिसांना मिळाला आहे. त्यानुसार तिचा मृत्यू जबर दुखापतीमुळं झाला आहे. पूजाच्या मणक्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, असं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण हिनं मागील महिन्यात वानवडी येथे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या.

त्यातील आवाज संजय राठोड यांचा असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर विरोधी पक्षानं हे प्रकरण उचलून धरत राज्य सरकारला घेरलं होतं. अखेर या प्रकरणात संजय राठोड यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

- Advertisement -

पूजा चव्हाण प्रकरणात इतका गदारोळ होऊनही पुण्यातील वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. कुठलीही तक्रार न आल्यानं गुन्हा दाखल केला नसल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं.

पूजाचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यानुसार तिचा मृत्यू जबर दुखापतीमुळं झाला आहे. पूजाच्या मणक्याला व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, असं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीनं ही माहिती दिली आहे.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर झालेल्या प्राथमिक तपासातूनही जबर दुखापत हेच कारण पुढं आलं होतं. आता शवविच्छेदनाच्या सविस्तर अहवालातून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

वानवडी पोलिसांनी याबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला आहे. माध्यमांना सविस्तर माहिती देऊ, असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष पोलिसांच्या माहितीकडे लागले आहे.

- Advertisement -