Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचं शुक्लकाष्ट आज संपणार

मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचं शुक्लकाष्ट आज संपणार

Uddhav Thackeray,Jayant Patil,Balasaheb Thorat, maharashtra vikas aghadi, ministry, maharashtra, mva, cabinet ministry

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन तीन दिवस लोटले. कोणत्या पक्षाकडे कोणते खाते द्याचे यावरून एकमत होत नसल्यामुळे खातेवाटपाला विलंब होत होता. अखेर आज गुरुवारी सायंकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होणार आहे. अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

खातेवाटपावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले, खातेवाटपावरून महाराष्ट्र विकास आघाडीत कोणतीही कुरबूर नाही. तिन्ही पक्षांमध्ये खातेवाटप झालेलं आहे. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांकडून विलंब झालेला नाही. आज गुरुवार २ जानेवारी सायंकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल, अशी माहिती राऊत यांनी दिली.

महाराष्ट्र विकास आघाडीत खातेवाटपावरून धुसफूस सुरू असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. या चर्चेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे. राऊत म्हणाले, “महाराष्ट्र विकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये संवाद राहावा. अनेक मुद्यांवर चर्चा व्हावी म्हणून शरद पवार यांनी सुकाणू समिती स्थापन करण्याची सूचना केली होती. या समितीतील तिन्ही पक्षाचे नेते भेटत असतात. खातेवाटपावरून कोणतीही कुरबूर नाही. तिन्ही पक्षांमध्ये आधीच खातेवाटप झालेलं आहे. पक्षातंर्गत खातेवाटपाचा प्रश्न शिल्लक होता. तोही जवळपास सुटला असून, संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल,” असं राऊत म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments