Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeदेश‘त्या’ पुस्तकावरून प्रकाश जावडेकर तोंडघशी; पुस्तक मागे घेतले नाही - गोयल

‘त्या’ पुस्तकावरून प्रकाश जावडेकर तोंडघशी; पुस्तक मागे घेतले नाही – गोयल

Prakash javadekar, shivaji maharaj, narendra modi

नवी दिल्ली : भाजपचे नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करताना लेखकाने पुस्तक मागे घेतलं असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागत हे पुस्तक मागे घेतल्याचं जावडेकर म्हणाले होते. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. परंतु पुस्तकाचे लेखक गोयल यांनी पुस्तक मागे घेतले नाही असं सांगितलं. यावरून जावडेकर तोंडघशी पडले आहे.

गोयल यांनी आज मंगळवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मला पक्षाकडून कोणत्याही सूचना करण्यात आल्या नाही. मी पुस्तक मागे घेतले नाही आणि माफिही मागीतली नाही. असं गोयल यांनी सांगितलं. तर दुसरीकडे भाजपच्या आयटी सेलचे संजय मयूख यांनीदेखील ट्विटरवरून पुस्तकाबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मयूख यांचा व्हिडिओ भाजपच्या ट्विटरवरून शेअर करण्यात आला आहे. त्यात मयूख यांनी म्हटलं आहे की, ‘गोयल यांनी हे त्यांचे वैयक्तिक लेखन असून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते मागे घेतो असं सांगितल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर पुस्तकाचे प्रकाशनही भाजपचे नाही.’ असं स्पष्ट केलं.

दोन दिवसांपासून जय भगवान गोयल यांच्या पुस्तकावरून वाद सुरु झाला आहे. विविध संघटना तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं आहे. जय भगवान गोयल यांच्याविरोधात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नागपूरमध्ये पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments