Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeदेशसीएए, एनआरसीला विरोध करणा-या प्रशांत किशोरची हकालपट्टी!

सीएए, एनआरसीला विरोध करणा-या प्रशांत किशोरची हकालपट्टी!

Nitish Kumar Prashant Kishor,Nitish Kumar, Prashant Kishor,Nitish, Kumar, Prashant, Kishor

बिहार : जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भाजप एकत्र सत्तेत आहे. मात्र, सीएए- एनआरसीला विरोध करणारे जेडीयू नेते प्रशांत किशोर यांच्या भूमिकेमुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची अडचण झाली होती. त्यामुळे प्रशांत किशोर यांची हकालपट्टी करण्यात आली.

सीएए, एनआरसीला विरोध करणारे जनता दल युनायटेड (जेडीयू) पक्षाचे उपाध्यक्ष आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि माजी राज्यसभा खासदार पवन वर्मा यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. प्रशांत किशोर यांनी सीएए- एनआरसीच्या विरोधातील भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे जेडीयूने कारवाई केली.

हा ठेवला ठपका…

पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत पक्षाध्यक्ष नितीशकुमार यांनी ही कारवाई केली आहे. जेडीयूचे मुख्य सरचिटणीस आणि राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पक्षाची शिस्त, पक्षाचा निर्णय आणि पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास हाच पक्षाचा मूळमंत्र असतो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पक्षाचे पदाधिकारी असतानाही प्रशांत किशोर यांनी अनेकदा वादग्रस्त विधानं केली जी पक्षाच्या निर्णयाविरोधात होती. त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या नितिशकुमार यांच्याविरोधात त्यांनी अपमानास्पद शब्दांचा वापरही केला. किशोर यांची भाषा आणखी खालच्या स्तराला जाऊ नये यामुळे त्यांना पक्षातून मुक्त करणे गरजेचे होते.

पवन वर्मा हे पक्षात आले त्यानंतर त्यांना जितका सन्मान मिळणे गरजेचे होते त्यापेक्षा अधिक सन्मान पक्षाचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी दिला. यानंतर त्यांनी पक्षाप्रती प्रामाणिक राहण्याऐवजी हा पक्षाचा नाईलाज असल्याची समजूत करुन घेतली. पक्षाच्या अध्यक्षांना पत्र लिहून ते सार्वजनिक करणे या कृतीवरुन त्यांना पक्षाची शिस्त स्विकारार्ह नसल्याचे दिसते. त्यामुळे प्रशांत किशोर आणि पवन वर्मा यांना जेडीयू तत्काळ प्रभावाने प्राथमिक सदस्यत्वासह अन्य सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments