Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमुख्य बातम्याविधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकरांची वर्णी

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकरांची वर्णी

Pravin Darekar,Darekar,Pravinमुंबई: विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेते पदासाठी आटापीटा करणा-या पंकजा मुंडे यांना संधी न देता प्रवीण दरेकरांना संधी देण्यात आली. दरेकरांच्या नावाची घोषणा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे स्पर्धेतील सर्वांनाच धक्का बसला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर, भाजपकडून विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. सर्वात आधी या शर्यतीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत होतं. त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस, सूरजीतसिंह ठाकूर यांची नावंही चर्चेत होती. मात्र शिवसेना त्यानंतर मनसेतून भाजपवासी झालेले प्रवीण दरेकर यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली आहे. दरेकर हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. विशेष म्हणजे दरेकरांपूर्वीपासून भाजपात काम करणारे नेते होते मात्र, त्यांना संधी न देता दरेकरांना संधी देऊन सर्वांनाच धक्का देण्यात आला.

नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला आज 16 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. हे अधिवेशन केवळ 6 दिवस चालणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.

प्रवीण दरेकरांचा राजकीय प्रवास…

प्रवीण दरेकर हे भाजपचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार आहेत.

प्रवीण दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात

मनसेमध्ये असताना दरेकर हे राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments