Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रचंद्रकांत पाटील सत्तेत असताना औरंगाबादचे नामांतरण का नाही? सोशल मीडियावर सवाल

चंद्रकांत पाटील सत्तेत असताना औरंगाबादचे नामांतरण का नाही? सोशल मीडियावर सवाल

Chandrakant Patil

मुंबई : औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर झालंच पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. त्यानंतर सोशल मीडियावर चंद्रकांत पाटलांवर प्रश्नांचा भडीमार करण्यात येत आहेत. सत्तेत असताना गोट्या खेळत होता का? सत्तेत असताना औरंगाबादचे नाव का बदलले नाही. असे प्रश्न विचारले जात आहेत.

शिवसेना- भाजपाची युती तुटल्यानंतर औरंगाबाद महानगरपालिका भाजप स्वबळावर लढवणार आहे. औरंगाबादच्या नामांतरचा विषय शिवसेनेचा असून आता भाजपने औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या भाजपने हा मुद्दा हायजॅक करु पाहात आहेत. मनसेचे आमदार राजु पाटील यांनीही औरंगाबादच्या नामांतराची मागणी केली आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादमध्ये नामांतराचा विषय उपस्थित केल्यामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर टिकेची झोड उठली आहे. मात्र, औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ठ असून, राजकीय फायद्यासाठी औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत भाजप नामांतराचा अस्त्र म्हणून त्याचा फायदा उचलण्याच प्रयत्न करताना दिसत आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले…

औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल आहे. त्या याचिकेच्या सुनावणीच्या प्रक्रियेला गती देऊन शहराचे नाव बदलले पाहिजे.  छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. औरंगजेब हा महाराष्ट्राचा शत्रू होता. त्यामुळे या शहराचे नामांतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments