Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रवंचितमध्ये फूट : पक्षावर प्रश्न उपस्थित करणे बेईमानी!

वंचितमध्ये फूट : पक्षावर प्रश्न उपस्थित करणे बेईमानी!

Prakash Ambedkar criticizes BJP government at Jalna rallyमुंबई : प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला उतरली कळा लागली आहे. वंचितमध्ये गळती सुरुच असून, माजी आमदार बळीराम सिरस्कारांसह ४७ पदाधिका-यांनी राजीनामे दिले. त्यानंतर पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी घणाघात केला. पक्षाच्या विश्वासहार्तेवर प्रश्न उपस्थित करणे बेईमानीचा नवा अध्याय आहे.

वंचितला सर्वात प्रथम माजी न्यायूमर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर लक्ष्मण माने यांनी आरएसएस आणि भाजपच्या लोकांनी वंचित आघाडी व्यापून टाकली आहे. त्यामुळे ही आघाडी बहुजनांची नसून उच्चवर्णीयांची झाली आहे. असा आरोप करत वंचितला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर विधानसभेच्या तोंडावर धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांनी वंचितला सोडचिठ्ठी दिली होती. आता माजी आमदार बळीराम सिरस्करांसह ४७ पदाधिका-यांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे वंचितची गळती सुरुच असल्याचे सध्याचे चित्र आहे.

राजीनामा सत्रानंतर राजेंद्र पातोडे म्हणाले, ३० वर्षे सत्ता आणि पदे मिळाली, १० वर्षे आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सभापती, लोकसभा उमेदवारी, जिल्हाध्यक्ष पदासहीत सर्व काही मिळविले आणि पक्षाच्या विश्वासाहार्तेवर प्रश्न उपस्थित करणे बेईमानी आहे.  विधानसभा निवडणुकीत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत उघड उघड पक्षाच्या विरोधात उमेदवार पाडण्यासाठी फिरणाऱ्या दोन्ही माजी आमदारांनी स्वतःची विश्वासाहार्ता तपासली पाहीजे. पक्षाचा विश्वास संपला असता, तर दोन्ही माजी आमदारांची उघड बेईमानी यशस्वी झाली असती. स्वबळावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता मिळाली नसती. त्यामुळे पक्षाची नव्हे तर दोन्ही माजी आमदारांची विश्वासाहार्ता संपली आहे”, असंही राजेंद्र पातोडे म्हणाले.

वंचित राज्याबाहेर कक्षा रुंदावत आहे…

वंचित आता राज्याबाहेर विविध राज्यात एनआरसी, सीएए आणि एनपीआर विरोधात आंदोलन करत आपल्या कक्षा रुंदावत आहे. पक्षाच्या विरोधात जावून केलेल्या बेईमानीवर जालीम उपाय करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील वंचितचे कार्यकर्ते सक्षम आहेत. यापूर्वी तसा प्रयत्न करणारे अनेक सुरमा आज राजकीय वनवासात आहेत. दोन्ही माजी आमदारांनी पक्ष सोडला असेल तर पक्षाच्या नावावर मिळालेल्या आमदारकीची पेंशन आणि सवलती देखील स्वाभिमान पूर्वक सोडून दिल्या पाहिजे”, असंही पातोडे यांनी सांगितले.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीतून एकूण ४७ जणांनी राजीनामे दिले आहेत. यामध्ये माजी आमदार बळीराम सिरस्कार, हरिदास भदे, राज्याचे महासचिव नवनाथ पडळकर, अर्जुन सलगर यांच्यासह अनेक जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख, महासचिव, सल्लागारांसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments