Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रअहमदनगरराधाकृष्ण विखे पाटील भाजपातून बाहेर पडणार!

राधाकृष्ण विखे पाटील भाजपातून बाहेर पडणार!

चलो एक पहल की जाए… नए रस्ते की ओर…

Radhakrishna Vikhe Patil, vikhe patil,patil,अहमदनगर : भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात भाजपचा एक गट सक्रिय झाल्यामुळे विखे पाटील एकाएकी पडले आहेत. त्यामुळे विखे पाटील भाजपला लकरच सोडचिठ्ठी देणार आहे. त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या फलकावरून भाजप गायब झाली आहे. चलो एक पहल की जाए… नए रस्ते की ओर…’ असं या होर्डिंगवर लिहिलं होतं. याचा नेमका अर्थ काय घ्यावा, यावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.

लोकसभेच्या तोंडावर मुलाला तिकीट नाकारल्यामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून विखे पाटील भाजपवासी झाले होते. त्यानंतर त्यांना तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदही मिळाले होते. मात्र, राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आता विखे पाटलांची भाजपात घूसमट सुरु झाली आहे.

विखे पाटील यांनी श्रीरामपूरमधील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाच्या फ्लेक्स बोर्डावरुन भाजप गायब होती. या कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्ह्यातील किंवा राज्यातील कोणतेही नेते उपस्थित नव्हते. नुकतंच पंकजा मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाचं मुंबईत उद्घाटन झालं, त्यावेळी भाजपचे अनेक नेते हजर राहिले होते. मात्र विखेंच्या ऑफिसच्या उद्घाटनाकडे भाजप नेत्यांनी पाठ फिरवल्याने भुवया उंचावल्या आहेत.

चलो एक पहल की जाए… नए रस्ते की ओर…’

विखे पाटलांच्या कार्यक्रमात लावलेला एक फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. ‘चलो एक पहल की जाए… नए रस्ते की ओर…’ असं या होर्डिंगवर लिहिलं होतं. याचा नेमका अर्थ काय घ्यावा, यावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. विखे पाटील भाजपातून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जून २०१९ ला झाला होता भाजप प्रवेश…

राधाकृष्ण विखे पाटील यांनी ४ जून २०१९ रोजी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसची साथ सोडल्यानंतर जुलै महिन्यात ते भाजपमध्ये सहभागी झाले. काही महिने त्यांनी गृहनिर्माण मंत्रिपदाची धुराही सांभाळली. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर ते शिर्डीतून पुन्हा आमदारपदी निवडून आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments