Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
HomeदेशVIDEO : राहुल गांधींचा मोदी सरकारला बजेटवरून टोला!

VIDEO : राहुल गांधींचा मोदी सरकारला बजेटवरून टोला!

rahul gandhi narendra modi maharashtra assembly election 2019नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बजेटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरलं आहे. राहुल गांधींनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. कृपया आपला जादुई व्यायामाचा दिनक्रम पुन्हा करा, तेच अर्थव्यवस्थेला पुन्हा सुरू करु शकते. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक असा संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधींनी २०२०-२१ च्या बजेटवर टीका करत त्यात काहीही नसल्याचं सांगितलं. मोदी सरकारनं बेरोजगारीशी दोन हात करण्यासाठी मोदी सरकारनं काहीही प्रयत्न केलेले नाहीत. या बजेटमधून रोजगार निर्माण होतील अशी कोणतीही उपाययोजना केल्याचं मला दिसलेलं नाही.

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सितारमन यांनी भारतीयांना सुसह्य जीवनाचे स्वप्न दाखविणारा यंदाचा अर्थसंकल्प शनिवारी सादर केला. मात्र या अर्थसंकल्पावरून विरोधकांनी केंद्रावर जोरदार टीका केली. हा अर्थसंकल्प कुचकामी असून गोंधळलेला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात ठोस काहीच नाही. नव्या बाटलीत जुनीच दारु असाच काही प्रकार आहे अशी टीका विरोधकांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments