Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याराज ठाकरे बुधवारपासून सत्ताधा-यांवर करणार हल्लाबोल !

राज ठाकरे बुधवारपासून सत्ताधा-यांवर करणार हल्लाबोल !

raj thackeray mns assembly election
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे निवडणूक प्रचाराचा शुभारंभ 9 ऑक्टोबर बुधवारपासून करणार आहेत. पुण्यात पहिली प्रचार सभा होईल. प्रचार काळात एकूण 15 सभा ते घेणार आहेत. या सगळ्या सभांमधून केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर ते हल्लाबोल करतील. यामुळे राज ठाकरे काय बोलणार सरकारच्या ध्येय धोरणाची कशी चिरफाड करणार याचीच उत्सूक्ता सर्वांनी लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत मनसेने एकही उमेदवार उभा केला नव्हता. तरीही राज ठाकरे यांनी निवडक ठिकाणी प्रचार सभा घेतल्या होत्या. खास पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे त्यांनी मोदी सरकारचे पोलखोल करणारे व्हिडीओ जनतेसमोर दाखविले होते. या व्हिडीओंमुळे राज यांच्या सभा जोरात गाजल्या होत्या. त्यांच्या सभांसाठी लोकांची गर्दीसुद्धा भरपूर व्हायची.

यावेळी मनसेने राज्यभरात 100 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार नसतानाही राज ठाकरे यांनी भाषणे गाजविली होती. यावेळी तब्बल 100 उमेदवार रिंगणात असल्यामुळे राज ठाकरे जोरदार बॅटिंग करतील असे बोलले जात आहे.

मागील महिन्यात ईडीने राज ठाकरे यांच्यावर कार्यवाहीला सुरूवात केली होती. चौकशीसाठी त्यांना पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर राज यांनी जाहीर भाषणे केलेली नाहीत. ईडीच्या कारवाईपुढे राज यांनी नमते घेतले की काय अशीही चर्चा सुरू झाली होती. पण राज यांनी सरकारच्या विरोधात 100 उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. त्यांच्यासाठी प्रचारसभाही निश्चित केल्या आहेत. त्यामुळे या सभा राज ठाकरे कशा गाजवतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

उत्सूकता ‘लाव रे तो व्हिडीओ’ची

लोकसभा निवडणुकीत सरकारची पोलखोल करणारे व्हिडीओ राज ठाकरे प्रचार सभांमधून दाखवत होते. यावेळीही असे व्हिडीओ दाखवणार आहेत का, याबाबत मनसेच्या गोटातून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. परंतु सरकारवर तोफा डागणारा बराच दारूगोळा राज यांच्याजवळ आहे. अशीही चर्चा मनसेच्या गोटात सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments