Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत उध्दव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत उध्दव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर

Ashok Gehlot,Uddhav Thackeray,Ashok ,Gehlot, Uddhav, Thackeray,Matoshreeमुंबई :  राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. मात्र, मुख्यमंत्री गेहलोत यांच्या भेटीचे कारण काय अद्यापही माहिती समोर आली नाही. यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देशभरार विरोधकांनी भाजप विरोधी एकत्र येण्यासाठी कंबर कसली आहे. देशात सध्या CAA आणि NRC  वरून वातावरण तापले आहे. रविवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी जेएनयू स्टुडन्टस् संघाच्या अध्यक्षाला मारहाण केली. त्याचे पडसाद देशभरात उमटत आहे. सर्वत्र या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भेटीदरम्यान काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments