Thursday, March 28, 2024
Homeदेशरामदास आठवले,उदनयराजेंना उमेदवारी; खडसेंचा पत्ता कट!

रामदास आठवले,उदनयराजेंना उमेदवारी; खडसेंचा पत्ता कट!

Athawale Khadse Bhosale,Ramdas Athawale, Eknath Khadse,Udyanraje Bhosale

नवी दिल्ली : भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमर साबळे आणि अपक्ष भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनाही उमेदवारी मिळाली नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीची चर्चा होती मात्र त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

उदयनराजे भोसले गुरुवारी (१२ मार्च) आपला राज्यसभेसाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या ७ खासदारांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुले एप्रिल महिन्यातच राज्यसभेच्या या ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याविषयी अनेक नावांची चर्चा होती. यात भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी खासदार उदयनराजे भोसले या तिघांची चर्चा होती. मात्र, उमेदवारांच्या घोषणेनंतर एकनाथ खडसेंचा पत्ता कट करण्यात आला आहे.

राज्यसभेसाठी महाविकासआघाडीला ४ जागा मिळणार आहे. तर राष्ट्रवादीच्या वाटेला २ जागा मिळणार आहे. या दोन्ही जागांपैकी एका जागेवर राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या जागेसाठी फौजिया खान यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

हे आहेत राज्यसभा नियुक्तीसाठी निकष…

राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची ३७ मतं आवश्यक आहेत. त्यामुळे आघाडीचे ४ तर भाजपचे २ उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून आणखी एक उमेदवार निवडून आणण्याचा आघाडीचा आणि भाजपचा प्रयत्न राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments