Friday, March 29, 2024
Homeदेशमहात्मा गांधीबद्दल वाईट बोलणारे रावणाची अवलाद : अधीर रंजन चौधरी

महात्मा गांधीबद्दल वाईट बोलणारे रावणाची अवलाद : अधीर रंजन चौधरी

Anantkumar Hegde Adhir Ranjan Chowdhary,Anantkumar Hegde, Adhir Ranjan Chowdhary,Anantkumar, Hegde, Adhir, Ranjan, Chowdharyनवी दिल्ली : आज हे महात्मा गांधीबद्दल वाईट बोलत आहेत,  ते रावणाची अवलाद आहेत. रामाच्या भक्ताचा ते अपमान करत आहेत. असा जोरदार हल्लाबोल काँग्रेसचे नेते खासदार अधीर रंजन चौधरी यांनी भाजपावर केला.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशात आज मंगळवार ( ४ फेब्रुवारी) लोकसभेत माजी केंद्रीय मंत्री व भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून जोरदार गदारोळ झाला. काँग्रेसचे नेते खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले. आज हे महात्मा गांधीबद्दल वाईट बोलत आहेत,  ते रावणाची अवलाद आहेत.  रामाच्या भक्ताचा ते अपमान करत आहेत.  त्यानंतर सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला.

महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी केलेली चळवळ हे निव्वळ नाटक होते, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे माजी केंद्रीय मंत्री व लोकसभा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केले. अशी नाटके करणा-यांना महात्मा का म्हणायचे, असा सवालही हेगडे यांनी केला आहे. बंगळूरु येथे शनिवारी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना हेगडे यांनी, “संपूर्ण स्वातंत्र्य चळवळ ही ब्रिटिशांच्या मदतीने चालवण्यात आली होती. या चळवळीतील नेते म्हणवणाऱ्यांना एकदाही पोलिसांची लाठी खावी लागली नाही. त्यामुळे त्यांची स्वातंत्र्य चळवळ हे एक मोठं नाटकं होतं. ब्रिटिशांची परवानगी घेऊन उभारलेलं हे एक ढोंग होतं. ही तडजोडीची स्वातंत्र्य चळवळ होती. असं म्हटलं होतं. तसेच, “त्याचबरोबर महात्मा गांधी यांनी केलेली उपोषणं आणि सत्याग्रह ही देखील ढोंगं होती, देशात लोक काँग्रेसला पाठिंबा देताना सांगतात की, त्यांच्या आमरण उपोषण आणि सत्याग्रहामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. मात्र, हे खरं नाही. ब्रिटिशांनी सत्याग्रहामुळे देश सोडलेला नाही,” असंही अनंतकुमार हेगडे यावेळी म्हणाले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments