Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या त्या वादग्रस्त विधानाविरूढ जिल्हा न्यायालयाचा दिलासा

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या त्या वादग्रस्त विधानाविरूढ जिल्हा न्यायालयाचा दिलासा

Indurikar, Indurikar Maharaj

आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेले प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना कोर्टाने तुर्तास दिलासा दिला आहे. संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेल्या आदेशाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांना संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयाने हजर राहण्याचा आदेश दिले होते. या प्रकरणी आज सकाळी 11 वाजता सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत जिल्हा न्यायालयाने प्रथमवर्ग न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराजांना कोर्टात हजर राहण्याची आवश्यकता नसणार आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाला 20 ऑगस्टला सुनावणीसाठी हजर राहावे लागणार आहे.

‘अमुक दिवशी स्त्रिसंग केला तर मुलगा होतो किंवा मुलगी होते’ असं वक्तव्य असलेला इंदुरीकर महाराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठली होती. काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती. मात्र, त्यांनी हे वक्तव्य कुठे आणी कधी केले याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचं कारण देत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता.

काय आहे प्रकरण?

‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. इंदुरीकर यांच्या किर्तनाचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ इतर सोशल माध्यमांवरही चांगलाच गाजला होता. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली होती.

१७ फेब्रुवारी रोजी या संदर्भातली माहिती समोर आली होती. इंदुरीकर महाराजांची एक व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली. ज्यात ते म्हणतात.. “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते” या वक्तव्यावरुन फेब्रुवारी महिन्यात मोठा वाद झाला होता.

इंदुरीकर यांच्यावर PCPNDT कायद्याच्या कलम २२ चं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यानुसार अहमदनगर येथील PCPNDT च्या सल्लागार समितीच्या सदस्यांनी त्यांना नोटीसही पाठवली होती. त्या नोटीशीला इंदुरीकर महाराज यांनी आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडत उत्तर दिलं होतं. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या रंजना गावंदे यांनी नोटीस दिली हाती. त्यामध्ये प्रशासनाने गुन्हा दाखल न केल्यास तुम्हालाही दोषी धरण्यात येईल, असंही म्हटले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments