Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यातील महापौरपदाचे आरक्षण जाहीर

राज्यातील महापौरपदाचे आरक्षण जाहीर

Reservation for the post of mayor of the state has been announced
राज्यातील महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिकसाठी महापौरपद खुल्यावर्गासाठी राखीव आहे. राज्यातील अनेक महापालिकांमधील महापौरपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला होता. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे सरकारने सोडतीला तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. त्याची मुदत २२ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे.

सरकारने दिलेली मुदतवाढ ही २२ नोव्हेंबर शुक्रवारला संपुष्टात येईल. त्यामुळे महापौरपदासाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, पनवेल, अकोला, चंद्रपूर, भिवंडी आणि जळगाव महापालिकेचं महापौरपद खुल्याप्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आता महापौर पदाच्या रेसमधील नेते फिल्डिंग लावण्यासाठी हालचाली करत आहेत.

हे आहे महापौर आरक्षण

  • मुंबई – ओपन
  • पुणे – ओपन
  • नागपूर – ओपन
  • ठाणे – ओपन
  • नाशिक – ओपन
  • नवी मुंबई – ओपन महिला
  • पिंपरी चिंचवड – ओपन महिला
  • औरंगाबाद – ओपन महिला
  • कल्याण डोंबिवली – ओपन
  • वसई विरार – अनुसूचित जमाती
  • मिरा भाईंदर – अनुसुचित जाती
  • चंद्रपूर – ओपन महिला
  • अमरावती – बीसीसी
  • पनवेल – ओपन महिला
  • नांदेड – बीसीसी महिला
  • अकोला – ओपन महिला
  • भिवंडी – खुला महिला
  • उल्हासनगर – ओपन
  • अहमदनगर – अनुसूचित जाती (महिला)
  • परभणी – अनुसूचित जाती (महिला)
  • लातूर – बीसीसी सर्वसाधारण
  • सांगली – ओपन
  • सोलापूर – बीसीसी महिला
  • कोल्हापूर – बीसीसी महिला
  • धुळे – बीसीसी सर्वसाधारण
  • मालेगाव – बीसीसी महिला
  • जळगाव – खुला महिला
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments