Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeदेशधास्ती : शाहीनबागमध्ये तीन महिन्यानंतर सन्नाटा!

धास्ती : शाहीनबागमध्ये तीन महिन्यानंतर सन्नाटा!

road-at-shaheen-bagh-opened after three-months-delhiनवी दिल्ली : कोरोना व्हायरसने धूमाकुळ घातला आहे. देशभरात आतापर्यंत आठ लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. शाहीन बागमध्ये आंदोलन करण्याऱ्या महिलांनी कोरोनाचा धसका घेतला असून सर्व महिलांनी आंदोलन संपवले आहे.

नागरिकता कायद्याविरोधात गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ शाहीनबागमध्ये या महिला आंदोलन करत होत्या. पण आता कोरोनाच्या दहशतीमुळे या महिला आंदोलन सोडून गेल्याचं चित्र समोर आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन कार्यकर्त्यांच्या संख्येत घट पाहायला मिळत असे. शाहीन बागेत ज्या मंडपात महिला आंदोलन करत होत्या त्या मंडपात आता चक्क शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

देशात कोरोना प्रकरणे सतत वाढत आहेत. देशातील दहापेक्षा जास्त राज्यात सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे, असे असूनही, लोक सतत घराबाहेर पडत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनच्या स्थितीबद्दल पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, अजूनही बरेच लोक लॉकडाऊन गांभीर्याने घेत नाहीत. कृपया स्वतःला वाचवा, आपल्या कुटुंबाला वाचवा, सूचनांचे गंभीरपणे पालन करा. मी राज्य सरकारांना विनंती करतो की त्यांनी नियम व कायद्यांचं पालन करण्यासाठी सांगावं.’

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments